Headlines

Tukaram mundhe fda action against solapur nobel hospital after sairat cinema actor arbaz shaikh allegations; सैराटमधील सल्या ढसाढसा रडला, तुकाराम मुंढेंचा सोलापुरातील रुग्णालयाला दणका! ५ तासांत मोठी कारवाई


सोलापूर: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १२ जून रोजी काढलेल्या आदेशात, ‘रुग्णांना रुग्णालयातील औषध विक्री दुकानातून औषध खरेदी करण्याची सक्ती नाही’, असे स्पष्ट नमूद केलेलं असतानाही राज्यात असे प्रकार अजूनही सुरू असल्याचं समोर आलं आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमात ‘सल्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख याला सोलापुरातील एका रुग्णालयात याबाबतचा भयंकर अनुभव आला. “माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने सोलापुरातील नोबल रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी गोळ्यांसाठी प्रिस्क्रिप्शन दिले. या गोळ्या मी बाहेरच्या मेडिकलमधून आणतो, असं सांगितल्यानंतरही त्यांनी मला रुग्णालयातीलच मेडिकलमधून गोळ्या घेण्यास भाग पाडलं. ज्या गोळ्या मी बाहेरच्या मेडिकलमधून २० हजारांमध्ये आणू शकत होतो, तिथे त्यांनी माझ्याकडून ४० हजार रुपये घेतले,” असा आरोप अरबाज शेख याने सकाळी केला होता. अरबाजच्या या व्हिडिओची सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाने तत्परता दाखवत नोबल रुग्णालयाशी संलग्न असलेल्या फातिमा मेडिकलची तपासणी करत औषध विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अभिनेता अरबाज शेख याच्या आरोपानंतर नोबेल रुग्णालयातील फातिमा मेडिकल सील करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी मेडिकलची तपासणी केली. तपासणीनंतर अरुण गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर ओपीडी आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टरां दिलेली औषधांची चिठ्ठी फातिमा मेडिकलमधील संगणकावर प्रसिद्ध होते. त्यामुळे प्राथमिक माहितीनुसार रुग्णांना याच मेडिकलमधून औषध घेण्यास सांगितले जात असल्याचे पुरावे आढळले आहेत,” असं गोडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

मेडिकलमध्ये अनेक त्रुटी

अन्न व औषध अधिकारी अरुण गोडसे यांना मेडिकलची तपासणी करताना अनेक त्रुटी आढळल्या आहेत. सदर मेडिकलमध्ये मुदत संपलेली म्हणजेच एक्सपायर झालेली औषधे आढळून आली आहेत.

अरबाज शेखचे आरोप

अभिनेता अरबाज शेख यांच्या वडिलांवर सोलापुरातील नोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रुग्णालयाकडून लूट सुरू असल्याचा आरोप करत त्याच रुग्णालयातून औषधे खरेदी करणे बंधनकारक असल्याचा दावा व्हिडिओमध्ये अरबाज शेख याने केला होता. “आम्ही वडिलांनी इथे दाखल केल्यानंतर त्यांनी १० हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितले. हे डिपॉझिट भरल्यानंतर त्यांनी आम्हाला काही गोळ्यांसाठी प्रिस्क्रिप्शन दिले. आम्ही या गोळ्या बाहेरून आणून देतो असं सांगितल्यानंतर त्यांनी त्याला नकार दिला आणि रुग्णालयाच्याच मेडिकलमधून औषधे आणून देण्यास सांगितलं. काही इंजेक्शन असतील ते सुद्धा इथूनच घ्यावे लागतील असं सांगितलं,” असा आरोप अरबाज शेखने केला होता.

काय आहे एफडीएचा आदेश?

“अनेकदा डॉक्टर अमुक एका मेडिकलमधूनच औषधे घ्या, असा आग्रह करतात. पण, रुग्णांना कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे विकत घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधून औषधे घेण्यास भाग पाडू नये,” असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले होते. या निर्देशांचे उल्लंघन करणारी रुग्णालये, डॉक्टर व औषध विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत