Headlines

IND vs SL 1st Test : भारताचा 600 व्या ऐतिहासिक सामन्यात दणदणीत विजय; मानव सुतारच्या 10 विकेट, सामनावीर कोण? – ind vs sl 1st test india won by 165 runs ind vs sl galle test cricket match sri lanka tour


India won test against srilanka : श्रीलंंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने १६५ धावाांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात युवा खेळाडू मानव सुतार याने दोन्ही डावात १० विकेट घेत यजमानांना बॅकफूटला ठेवले. मात्र सामनावीर म्हणून वेगळ्याच खेळाडूला गौरवण्यात आले, नेमका कोण जाणून घ्या.

IND Win Test against sri lanka
IND Win Test against sri lanka(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करत ६०० वा ऐतिहासिक कसोटी सामना १६५ धावांनी जिंकला आहे. शेवटच्या दिवशी भारताला सहा विकेटची गरज होती. यामधील चार विकेट एकट्या मानव सुतार याने घेत सामना जिंकवला. या सामन्यामध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४६२ धावा केल्या होत्या. श्रीलंका संघाला २८४ धावांवर ऑल आऊट करत भारताने १७८ धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताला श्रीलंका संघाने १९३ धावांवर ऑल आऊट करत कमबॅक केलेले. पण चौथ्या दिवशी श्रीलंकेचा संघ बॅटिंगला उतरला तेव्हा त्यांच्या ४७ धावांवर ४ विकेट गेल्या. आज भारताला विजयासाठी सहा विकेटची गरज होती, तर श्रीलंकेकडून सोनाल दिनूशा ८४ धावा आणि कॅप्टन धनंजय डिसिल्वाने ५९ धावा करत संघर्ष केला होता. परंतु मानव सुतारच्या फिरकीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. स्वातंत्र्यदिनादिवशी सुरू झालेला हा ६००वा ऐतिहासिक कसोटी सामना भारताने जिंकला असून दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दोन्ही डावांमध्ये (पहिला डाव १६७ धावा, दुसरा डाव ४४ धावा) मिळून याला २११ धावा करणाऱ्या देवदत्त पडिक्कलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

भारताकडून पहिल्या डावामध्ये देवदत्त पडिक्कल याने सर्वाधिक २३० चेंडूत १६७ धावांची विक्रमी खेळी केली होती. के.एल. राहुलच्या ८२ धावा आणि ध्रुव जुरेलच्या ५१ धावांची अर्धशतकी खेळीने भारताने ४६२ धावांचा डोंगर उभारला होता. श्रीलंकेकडून प्रभाथ जयसूर्याने सर्वाधिक ४ आणि केशरा नुवांथाने ३ विकेट घेतल्या होत्या. श्रीलंकेचा संघफलंदाजीला उतरल्यावर २८४ धावांवर ऑल आऊट झाला. सोनाल डिसूथाने १०० धावांची शतकी खेळी केली होती. तर निरोशन डिकवेलाने ८० धावा करत संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर घातली होती. भारताकडून मानव सुतार याने सर्वाधिक ४ आणि रविंद्र जडेजाने ३ विकेट नावावर केल्या होत्या.

Maharashtra TimesIND vs SL 1st Test : ऋषभ बेजबाबदार खेळतो म्हणत कितीही नावे ठेवा पण पंत ठरलाय भारताचा कसोटी नंबर वन प्लेयर; कॅप्टन गिल, रोहित, विराट सगळेच पिछाडीवर
भारताने १७८ धावांची आघाडी घेत दुसऱ्या डावाला सुरूवात केली होती पण श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. यशस्वी जयस्वाल ० धावा, शुभमन गिल ८ धावा, ध्रुल जुरेल ७ धावा, रविंद्र जडेजा ९ धावा करून स्वस्तात आऊट झाले होते. दुसऱ्या डावात ऋषभ पंत याने ६९ चेंडूत ६६ धावांची महत्त्वाची खेळी केली होती. ऋषभची ही खेळी भारतासाठी उपयुक्त ठरली, भारत १९३ धावांवरच ऑल आऊट झाला होता. श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज चालले होते, असिथान फर्नांडोने ४ आणि प्रभाथ जयसूर्याने ३ आणि लाहिरू कुमार याने २ विकेट घेतल्या होत्या.

Maharashtra TimesIND vs PAK : हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक आमनेसामने, पाकिस्तानला विजय आवश्यकच, सामना किती वाजता आणि कुठे पाहता येणार?
श्रीलंकेचा संघ बॅटिंगला उतरल्यावर त्यांना जिंकण्यासाठी ३७२ धावांचे टार्गेट होते. मात्र चौथ्या दिवशी त्यांनी महत्त्वाच्या चार विकेट गमावल्या होत्या, चौथ्या विकेटसाठी धनंजय आणि डिसूथा यांनी केलेली २०२ चेंडूत ९५ धावांची भागीदारी जडेजाने फोडली होती. धनंजय डिसिल्वाने ५९ धावांची दमदार खेळी केली होती. सोनास डिसूथाने एक बाजू लावून धरली होती मात्र मानव सुतारने त्याला आऊट करत सामना झुकवला. तळाच्या फलंदाजांना फिरकीत अडकवत २०६ धावांवर श्रीलंका संघाला ऑल आऊट केले. भारताकडून मानव सुतार याने या डावात सर्वाधिक ६ विकेट घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णा २, सिराजसह जडेजाने १-१ विकेट घेतली.

महत्त्वाच्या टप्प्यावर

  • १००वी: १९६७, इंग्लंडविरुद्ध पराभव (भारताचे कर्णधार मन्सूर अली खान पतौडी)
  • २००वी: १९८२, इंग्लंडविरुद्धची कसोटी अनिर्णित ( कर्णधार सुनील गावसकर)
  • ३००वी : १९९६, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय (कर्णधार सचिन तेंडुलकर)
  • ४००वी : २००६, वेस्ट इंडिजविरुद्ध विजय (कर्णधार राहुल द्रविड)
  • ५००वी : २०१६, न्यूझीलंडविरुद्ध विजय (कर्णधार विराट कोहली)
  • ६००वी : २०२६, श्रीलंकविरूद्ध विजय (कर्णधार शुभमन गिल)
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा