Headlines

Chhatrapati Sambhajinagar Hatnur Ruikheda Sick Father in Bullock Cart; डिजिटल इंडियाच्या काळात विदारक वास्तव! वयोवृद्ध बापाला रुग्णालयात नेण्यासाठी लेकाची धडपड, चिखलाने रस्ता रोखला; तीन किमी बैलगाडीतून प्रवास


Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हतनूर-रुईखेडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एका रुग्णाला वेळेवर उपचार मिळवण्यासाठी चिखलातून बैलगाडीने प्रवास करावा लागला. मुसळधार पावसात आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी एका मुलाने केलेली धडपड पाहून प्रशासनाच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Hatnur Father Bullock Cart
छत्रपती संभाजीनगर हतनूर वडिलांना बैलगाडीतून नेलं(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : एकीकडे देश प्रगतीचे आणि डिजिटल क्रांतीचे दावे करत असताना, दुसरीकडे ग्रामीण भागात रस्ते आणि आरोग्य व्यवस्थेचे अत्यंत विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एका वयोवृद्ध रुग्णाला उपचारासाठी चक्क रुग्णवाहिकेऐवजी बैलगाडीतून नेण्याची दुर्दैवी वेळ आली. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ता चिखलमय झाल्यानं उपचारासाठी निघालेले डॉक्टर अर्ध्या वाटेतच अडकले. अखेर एका हतबल मुलाने आपल्या आजारी वडिलांना बैलगाडीत बसवून तीन किलोमीटरचा खडतर प्रवास करत डॉक्टरांचं ठिकाण गाठलं.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील रुईखेडा येथील रहिवासी असलेले वयोवृद्ध रुस्तुम दहातोंडे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं पाहून त्यांचे सुपुत्र रामू दहातोंडे यांनी तातडीने उपचारासाठी हतनूर येथील डॉ. विवेक अकोलकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना गावी येण्याची विनंती केली. डॉ. अकोलकर यांनीही तत्परता दाखवत दुचाकीवरून रुईखेडा गावाकडे धाव घेतली. मात्र, हतनूर ते रुईखेडा या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे प्रचंड चिखल साचला होता. चिखलाचे साम्राज्य इतकं होतं की डॉक्टरांना दुचाकी चालवणं अशक्य झालं आणि त्यांना अर्ध्या वाटेवरच थांबावं लागलं.
Maharashtra TimesKolhapur Crime : ‘आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी’; स्टेटस ठेवून पत्नीला भररस्त्यात संपवलं, ‘विषय संपला’ म्हणत मिशीवर ताव, प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत

तीन किलोमीटरचा चिखलमय प्रवास अन् बैलगाडीत उपचार…

डॉक्टर चिखलामुळे पुढे येऊ शकत नसल्याचं समजताच रामू दहातोंडे यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं. वडिलांचा जीव वाचवणं गरजेचं असल्यानं त्यांनी कोणतीही वेळ न घालवता तत्काळ आपल्या बैलगाडीची व्यवस्था केली. आजारी रुस्तुम दहातोंडे यांना बैलगाडीत झोपवून रामू यांनी चिखल तुडवत तब्बल तीन किलोमीटरचं अंतर पार केलं आणि जिथे डॉक्टर थांबले होते तिथे वडिलांना पोहोचवले. रस्त्यावरच बैलगाडी उभी करून डॉ. विवेक अकोलकर यांनी वयोवृद्ध रुस्तुम दहातोंडे यांच्यावर प्राथमिक उपचार केले.
Maharashtra TimesSarpanch Mangesh Sable: सरपंच मंगेश साबळेंना अटक; गोंधळ घालत जिल्हाधिकाऱ्यांना एकेरी भाषेत आव्हान

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा खिळखिळ्या

विशेष म्हणजे, हतनूर-रुईखेडा या रस्त्याचं काम शासकीय स्तरावर मंजूर झालेलं आहे. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे आणि संथ कारभारामुळे हे काम अद्यापही रखडलेलेच आहे. रस्ता मंजूर होऊनही जर वेळेत काम पूर्ण होत नसेल आणि आपत्कालीन स्थितीत नागरिकांना रुग्णवाहिकेऐवजी बैलगाडीचा आसरा घ्यावा लागत असेल, तर ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा किती खिळखिळ्या झाल्या आहेत, हेच यावरून स्पष्ट होते. या गंभीर प्रकारामुळे कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा