भारतीय स्वदेशी टेक कंपनी ‘Ai+’ ने देशांतर्गत बाजारात आपले दोन नवीन 5G स्मार्टफोन ‘Nova 2 Neo 5G’ आणि ‘Nova 2 Pro 5G’ लॉन्च केले आहेत. ‘इंडियाज गॉट नोवा’ या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध कॉमेडियन समय रैनाच्या उपस्थितीत हे फोन्स सादर करण्यात आले. अवघ्या 12,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ग्राहकांना 6000mAh ची दमदार बॅटरी आणि 48MP चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे.

Ai+ Nova 2 Neo 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर, 6000mAh बॅटरी, 2 GB पर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेज आणि 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा यासारखे खास फीचर्स मिळणार आहेत.
या डिव्हाइससाठी तुम्हाला 13 हजार ते 14 हजार रुपये खर्च करावे लागतील, हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
Ai+ Nova 2 Neo 5G किंमत
या फोनचे दोन व्हेरिएंट लाँच केले गेले आहेत, 4GB रॅमसह 128GB स्टोरेज आणि 6GB रॅमसह 128GB स्टोरेज. 4 GB रॅम प्लस 128 GB स्टोरेजच्या फोनची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर या फोनची विक्री 26 जूनपासून फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, हा 5G फोन Vivo T4 Lite 5G, Realme P4 Lite 5G आणि Samsung M06 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
Ai+ Nova 2 Pro च्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत 15,999 रुपये आणि 8GB + 128GB मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे. सर्व प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1000 रुपयांची इन्स्टंट बँक सूट लागू आहे.
Ai+ Nova 2 Neo 5G फीचर्स
- चिपसेट: या 5G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6300 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
- डिस्प्ले: या बजेट फोनमध्ये 6.74 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस 48 मेगापिक्सलचा Sony IMX582 AI कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर असेल.
- बॅटरी कॅपेसिटी: फोनमध्ये लाईफ आणण्यासाठी 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी 18 वॉट फास्ट चार्जला सपोर्ट करते.
- स्टोरेज: फोनमध्ये 128 GB इंटरनल स्टोरेज मिळेल, परंतु SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येईल.
- खास फीचर्स: सुरक्षेसाठी फोनच्या बाजूला असलेल्या पॉवर बटणात फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला AI सपोर्ट देखील मिळेल.
- ऑपरेटिंग सिस्टम: हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित नेक्स्टक्वांटम OS वर काम करतो.
- कनेक्टिव्हिटी: ड्युअल सिम 5G असलेल्या या फोनमध्ये Wi-Fi 5, ब्लूटूथ, USB टाइप-C पोर्ट आणि GPS सारखे फीचर्स मिळतील.
Ai+ Nova 2 Pro 5G स्पेसिफिकेशन्स
- 6.9-इंच (2340 x 1080 पिक्सल) FHD+ 144Hz LCD स्क्रीन 800 निट्स HBM ब्राइटनेससह
- माली-जी 610 जीपीयूसह 2.4 गीगाहर्ट्झ ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंसिटी 7100 6NM प्रोसेसर
- 8 GB रॅम, 128 GB स्टोरेज, मायक्रोएसडीसह 2TB पर्यंत एक्सपेंडेबल मेमरी
- ड्युअल सिम (नॅनो + नॅनो + मायक्रोएसडी)
- अँड्रॉइड 16 सह एनएक्सटीक्यू ओएस
- सोनी IMX582 सेन्सरसह 48MP रिअर कॅमेरा, f/1.8 अपर्चर, f/2.2 अपर्चरसह 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, LED फ्लॅश, 2K 30fps व्हिडिओ रेकॉर्डिंग
- 13MP फ्रंट कॅमेरा, f/2.0 अपर्चर, 2K 30fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग
- साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर
- यूएसबी टाइप-सी ऑडिओ, स्टिरिओ स्पीकर्स
- परिमाण: 169.4×80.5×8.2 मिमी वजन: 213 ग्रॅम
- धूळ आणि स्प्लॅश रेझिस्टंट (IP65 रेटिंग्ज)
- 5G SA/एनएसए, ड्युअल 4G व्हीओएलटीई, Wi-Fi 802.11 AC (2.4 गीगाहर्ट्ज + 5 गीगाहर्ट्झम), ब्लूटूथ 5.4, जीपीएस/ग्लोनास/बीडू, USB टाइप-C
- 33W फास्ट चार्जिंगच्या. सपोर्टसगह 6000mAh (टिपिकल) बॅटरी

