Asim Munir: भारताच्या कट्टर शत्रूला यमसदनी धाडण्यासाठी इस्रायलची जगविख्यात गुप्तचर यंत्रणा मोसादनं पूर्ण तयारी केली होती. यासाठी वेळ आणि ठिकाणदेखील निश्चित करण्यात आलं होतं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इस्लामाबाद: ब्राझीलचे पत्रकार आणि भूराजकीय तज्ज्ञ पेपे एस्कोबार यांच्या सनसनाटी दाव्यानं पाकिस्तानपासून इराणपर्यंत खळबळ उडाली आहे. इस्रायलची जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणा मोसादनं पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि त्यांच्या संपूर्ण शिष्टमंडळाच्या हत्येचा कट रचला होता, असा दावा एस्कोबार यांनी केला आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि भारताचे कट्टर शत्रू इराण-अमेरिका शांतता चर्चेसाठी स्वित्झर्लंडच्या जिनेव्हात असताना हत्येची योजना आखण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू असताना पाकिस्तान मध्यस्थी करत होता. संघर्ष संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. दोन्ही देशांमधील सुरुवातीच्या कराराला ‘इस्लामाबाद सामंजस्य करार’ असं नाव देण्यात आलं. या करारवर पुढील चर्चा जिनिव्हात झाली. त्यावेळी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांच्यासह अनेक बडे अधिकारी उपस्थित होते. PM Modi: इराणकडून PM मोदींना विशेष आमंत्रण, भारताची विचित्र कोंडी; 2024 ची पुनरावृत्ती होणार? मोसादनं आसिम मुनीर यांच्या हत्येचा कट रचला होता, असा सनसनाटी दावा ब्राझीलचे शोध पत्रकार आणि भूराजकीय विश्लेषक पेपे एस्कोबार यांनी केला. मारिया नवाफल यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी हा दावा केला. मारियो एक राजकीय भाष्यकार आहेत.
स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत मुनीर आणि पाकिस्तानी शिष्टमंडळाला मोसाद संपवणार असून त्यासाठी त्यांची तयारी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती, असा दावा एस्कोबार यांनी केला. मुनीर यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान अनेकदा चिथावणीखोर विधानं केली होती. Crude Oil: होर्मुझ मार्ग खुला, खनिज तेलही स्वस्त; पण आता वेगळंच संकट; सामान्यांच्या खिशाला झळ इस्रायली नेत्यांनी इराण-अमेरिका शांतता करारावर तोंडसुख घेतलं होतं. या करारावर चर्चा करताना इस्रायलनं आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. लेबनॉनवर इस्रायलवर करत असलेल्या हल्ल्यांमुळे हा करार धोक्यात येण्याची दाट शक्यता होती. इराणचा पाठिंबा असलेली हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना आपल्यासाठी धोकादायक असल्याचं म्हणत इस्रायलनं लेबनॉनविरोधातील कारवाया रोखण्यास नकार दिला होता.
‘इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या आदेशावरुन मोसाद आसिम मुनीर आणि स्वित्झर्लंडला जाणाऱ्या पाकिस्तानी शिष्टमंडळाच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती पाकिस्तानी सैन्याला मिळाली होती. कटाबद्दल समजताच पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी राजदूतांच्या माध्यमातून उत्तर दिलं होतं. मध्यस्तांकडून पाकिस्ताननं थेट संदेश पाठवला. माझ्या अंदाजानुसार, ओमानच्या माध्यमातून इस्रायलला संदेश पाठवला गेला. ‘आमच्या शिष्टमंडळाला काही झाल्यास, त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास तुमचा देश नकाशावर दिसणार नाही. तुमचं अस्तित्वच संपवून टाकू.’ पाकिस्तानकडून याच शब्दांत इस्रायलला देण्यात आला. आमच्या सुत्रांनी हीच माहिती दिली आहे,’ असं एस्कोबार यांनी सांगितलं.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा