प्रवेश मिळाला नाही म्हणून IIT कानपूरची वेबसाइट हॅक केली, कारवाई ऐवजी इंटर्नशिपची ऑफर – student hacked iit kanpur website after failing to secure admission offered internship
प्रवेश मिळाला नाही म्हणून IIT कानपूरची वेबसाइट हॅक केली, कारवाई ऐवजी इंटर्नशिपची ऑफर – student hacked iit kanpur website after failing to secure admission offered internship
तुम्ही देशातल्या एका अत्यंत नामांकित संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी दिवस-रात्र एक करता. पण शेवटी तुम्हाला रिजेक्शन मिळतं… म्हणजे प्रवेश नाकारला जातो! अशा वेळी सामान्यतः विद्यार्थी काय करेल? निराश होईल, रडेल किंवा दुसऱ्या कॉलेजचा पर्याय शोधेल. पण एका तरुणाने असं काही केलं, ज्याची कल्पनाही कुणी केली नसेल! प्रवेश नाकारला म्हणून त्याने थेट भारताच्या टॉप टेक्निकल संस्थांपैकी एक असणाऱ्या IIT Kanpur ची अधिकृत वेबसाइटच हॅक करून टाकली! आणि हॅक करून काय केलं माहित्ये? कोणतीही चोरी नाही, कोणताही डेटा नष्ट केला नाही… फक्त एक मेसेज सोडला — ‘Site is Hacked, All I Need Is Just a Fair Chance’ म्हणजे ‘मला फक्त एक संधी हवी आहे!’ आता तुम्हाला वाटत असेल, की पोलीस आले असतील, FIR झाली असेल आणि त्या मुलाचं करिअर संपलं असेल, बरोबर? पण थांबा इथेच तर सर्वात मोठा ट्विस्ट आहे! IIT कानपूरने या हॅकरविरुद्ध जेलची कारवाई करण्याऐवजी त्याला एक अशी संधी दिलीय, ज्याचा विचारही कुणी केला नसेल! नेमकं काय घडलं? IIT कानपूरने काय निर्णय घेतला? आणि या घटनेतून काय शिकायला मिळतं? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया…