Headlines

परीट समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा


सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका परीट समाजाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील दहावी, बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सावंतवाडी येथीलश्रीराम वाचन मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात दिलीप भालेकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत असताना आपले ध्येय निश्चित करावे. त्या ध्येयाच्या वाटेवर वाटचाल करत स्वतःची उन्नती साधावी. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन एमपीएससी, यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षा देत अधिकारी बनावे, समाजाचा नावलौकिक वाढवावा आणि समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान द्यावे. आमची कौतुकाची थाप कायम तुमच्या पाठीशी राहील.”

यावेळी व्यासपीठावर फॉरेस्ट ऑफिसर श्रीकृष्ण परीट, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश कुडाळकर, जिल्हा सचिव अनिल शिवडावकर, जिल्हा सहसचिव गुरुनाथ मडवळ, जिल्हा खजिनदार संदीप बांदेकर, महिला सदस्या सविता कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजू भालेकर, महिला तालुकाध्यक्षा देवयानी मडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सावंतवाडी तालुका परीट समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोहर रेडकर, लक्ष्मीदास आजगावकर, जितेंद्र मोरजकर, दयानंद रेडकर, प्रदीप भालेकर, भगवान वाडकर, विजय सांगेलकर, तुषार बांदेकर, सदाशिव कुडाळकर, संजय होडावडेकर, प्रवीण मोरजकर, योगेश आरोलकर, लक्ष्मण बांदेकर, सुरेंद्र कासकर, वरुण भालेकर, श्री. तीरोडकर, श्री. मडवळ, जय भालेकर तसेच महिला भगिनी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय भालेकर यांनी केले. तालुकाध्यक्ष राजू भालेकर यांनी प्रास्ताविक केले, तर शहराध्यक्ष दयानंद रेडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत