Headlines

Satara Students Protest Against NEET Paper Leak


नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यात गुरुवारी भर पावसात विद्यार्थी व युवक रस्त्यावर उतरले. युनायटेड यूथ फ्रंटच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या या मोर्चात

.

पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शाहू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. “विद्यार्थ्यांना न्याय द्या” आणि “शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबवा” अशा आशयाचे फलक सहभागींच्या हातात झळकत होते.

शाहू चौकातील सभेत वक्त्यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भर पावसातही मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाल्याने आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

नीट परीक्षेच्या कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेलाही साताऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागांत फिरून व्यापारी आणि व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तर विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. साताऱ्यात काही ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू राहिले, तर काही व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला.

हे ही वाचा…

दिल्लीतील लाठीचार्जचा सिंदेवाहीत तीव्र निषेध:हे विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेलं निष्ठूर सरकार, विजय वडेट्टीवार यांची सडकून टीका

दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका करत त्यांनी, “हे सरकार शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या जिवावर उठणारे निष्ठूर सरकार आहे. लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्यांना लाठ्यांनी उत्तर देणारे सरकार लोकशाहीच्या मूल्यांवर घाला घालत आहे,” असा घणाघाती आरोप केला. सविस्तर वाचा…

विद्यार्थी आंदोलनात देशविरोधी घोषणा का?:देशहिताच्या गोष्टी राहुल गांधींच्या तोंडी शोभत नाहीत, त्यांनी आपल्या उंचीनुसार बोलावे – नीतेश राणे

राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधत, “देशहिताच्या आणि तरुणांच्या हिताच्या गोष्टी राहुल गांधींच्या तोंडी शोभत नाहीत,” अशी टीका केली. नीट परीक्षा आणि त्यावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर आरोप करत केंद्र सरकार परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पावले उचलत असल्याचा दावा केला. सविस्तर वाचा…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत