Headlines

गोंडवाना विद्यापीठात उद्यापासून रंगणार युवा साहित्य संमेलन; पुण्याचे अक्षय चंदेले भुषवणार अध्यक्षपद – gondwana university and vidarbha sahitya sangh to hold yuva sahitya sammelan on 5th 6th march pri


Yuva Sahitya Sammelan: गोंडवाना विद्यापीठ आणि विदर्भ साहित्य संघ यांचे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन ५ आणि ६ मार्च रोजी विद्यापीठाच्या नवीन सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

gondwana university
gondwana university(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठ आणि विदर्भ साहित्य संघ यांचे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन ५ आणि ६ मार्च रोजी विद्यापीठाच्या नवीन सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या गडचिरोली शाखेच्यावतीने होत असलेल्या या संमेलनाचे पुणे येथील अक्षय चंदेल हे अध्यक्ष आहेत. जळगाव येथील हर्षल पाटील हे उद्‌घाटक आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे स्वागताध्यक्ष आहेत.

संमेलनाची सुरुवात बुधवारी सकाळी १० वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. सकाळी १०.३० वाजता उद्‌घाटन होईल. या सोहळ्याला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आमटे यांची विशेष उपस्थिती असेल. संमेलनाचे स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, सहस्वागताध्यक्ष; प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, गतवर्षीच्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. किशोर कवठे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
Maharashtra Timesसत्तेसाठी घोडेबाजार! अविश्वास ठरावावरुन देवीदास पिंगळेंचा महाजनांवर गंभीर आरोप; प्रत्येकी ५० लाख दिल्याचा दावाउद्‌घाटन सत्रानंतर दुपारी १.३० वाजता ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी भाषा’ या विषयावर परिसंवाद आहे. पुण्यातील ‘उत्तम अनुवाद’चे संपादक अभिषेक जाखडे हे अध्यक्षस्थानी राहतील. दुपारी २.३० वाजता अभिरूप न्यायालय होईल. किशोर बळी हे ‘आरोपी’ असून मिलिंद उमरे हे न्यायाधीश म्हणून भूमिका पार पाडतील. वैभव भिवरकर हे वकील असतील. दुपारी ३.३० वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. मुंबईचे जितेंद्र लाड अध्यक्षस्थानी राहतील. दुपारी ४.३० वाजता ‘वाचायचे का? काय? कसे’ या विषयावर परिसंवाद होईल. ‘निर्माण’चे अमृत बंग हे अध्यक्षस्थानी राहतील. सायंकाळी ५.३० वाजता मराठी अभिजात परंपरेचा उत्सव अंतर्गत मराठी शायरी आणि कवितांची मैफल होईल. प्रा. ज्ञानेश्वर गटकर हे सादरकर्ते आहेत. पहिल्या दिवसाचा समारोप ‘नली’ या एकलनाट्याने होईल.
Maharashtra Timesमुंबईची यंदाही तुंबई? पम्पिंग स्टेशनअभावी अंधेरी, शीव, वडाळ्यासह ‘या’ भागात पूरधोका कायम
या संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी १० वाजता ‘अभिजात मराठी आणि बोलीभाषा’ या विषयावरील परिसंवादाने होईल. अध्यक्षस्थानी मनोज मोहिते राहतील. सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांचे कविसंमेलन होईल. गीता देव्हारे अध्यक्षस्थानी राहतील. दुपारी १२ वाजता ‘साहित्य संमेलने आणि वर्तमानाचा शोध’ या विषयावर परिसंवाद होईल. लेखिका स्नेहा टोंपे या अध्यक्षस्थानी राहतील. पेंच अभयारण्याचे मंदार पिंगळे हे दुपारी १.३० वाजता ‘पर्यावरण जागृती’ हा कार्यक्रम सादर करतील. दुपारी २ वाजता गझल मुशायरा होईल.
Maharashtra Timesगोठवलेल्या पदावर नियुक्ती कशी? ST महामंडळ ३ वर्षांपासून मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्याविना
अध्यक्षस्थानी अनिकेत सोनावणे असतील. दुपारी ४ वाजता कोल्हापूर येथील प्रसिद्ध सरोदवादक विजया कांबळे यांच्या सरोदवादनाचा कार्यक्रम होईल. समारोपीय सत्र दुपारी ४.३० वाजता सुरू होईल. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक देवीदास सौदागर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा