अनेकदा काही हुशार मंडळी घराचे भाडे किंवा इतर EMI भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरतात. जर तुम्हीही हीच पद्धत वापरत असाल तर आत्ताच सावध राहा अन्यथा भविष्यात तुमच्या खिशाला फार मोठा खड्डा पडू शकतो. क्रेडिट कार्ड वापरण्याचेही काही नियम असतात. त्या नियमांच्या चौकटीत राहून तुम्ही योग्य पद्धतीने क्रेडिट कार्ड वापरला तर ते फायद्याचे ठरू शकते पण अनेकदा बहुतेक मंडळी क्रेडिट कार्डच्या नियमांना दुर्लक्षित करून या पद्धतीचा गैरवापर करतात आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात.
जर तुम्हीही क्रेडिट कार्डचा वापर करून तुमच्या घराचे भाडे किंवा दर महिन्याचा EMI भरत असाल तर तुम्हाला काही नुकसानांना सामोरे जावे लागू शकते. अनेकदा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठ्या रकमेत व्यवहार करताना प्रोसेसिंग फी आकारली जाते. जर पेमेंट करणाऱ्या कंपनीकडून किंवा जागेच्या मालकाकडून अशा प्रकारचे शुल्क आकारण्यात आले तर तुमच्या खिशावर भार वाढू शकतो.
उदाहरणार्थ., जर भाड्याची रक्कम 20,000 असेल आणि त्यावर प्रोसेसिंग फी रेट 2% असेल तर तुम्हाला भाड्याच्या रकमेत उगाचच 400 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. प्रत्येक ठिकाणी प्रोसेसिंग फी आकारली जात नाही जर ती आकारली गेली तर त्याचा दर साधारणता 1 to 3% इतका असू शकतो.
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा तुम्हाला दिलेल्या मुदतीच्या आत क्रेडिट बिल जमा करावा लागतो. जर तुम्ही दिलेल्या मुदतीच्या आत क्रेडिट बिल जमा करण्यात असक्षम ठरलात तर त्या रकमेवर व्याजदर मोजण्यात येतो. एकंदरीत, आधीच तुम्ही 20,000 रुपयांच्या जागी प्रोसेसिंग फी सह 20,400 रुपयांची रक्कम जमा कराल त्यात वेळेवर क्रेडिट कंपनीला पैसे परत केले नाही तर त्यावर संबंधित बँकेच्या नियमांनुसार व्याजदर आकारण्यात येईल.
क्रेडिट कार्डचा व्याजदर हा इतर व्याजदरांपेक्षा त्यामानाने जास्त असतो. समजा, तुम्ही पैसे परत करण्याची मुदत चुकवली आणि तुम्ही ज्या बँकेचा क्रेडिट कार्ड वापरता त्या बँकेच्या क्रेडिट कार्डसाठी ठरवण्यात आलेला व्याजदर 3.5% असेल तर तुम्ही खर्च केलेल्या 20 हजारावर 700 रुपये प्रति महिना व्याज आकारण्यात येईल. त्यातसह लेट पेमेंट फीज, जीएसटी तसेच इतर चार्जेसही लागू शकतात.
भविष्यात कर्ज मिळण्यात अडचण
1947 मध्ये डॉलरची किंमत होती 3 रुपये 30 पैसे, 80 वर्षांत 95 चा आकडा कसा पार केला? इतिहास अन् गणित समजून घ्याजर तुम्ही आधीचीच रक्कम वेळेवर परत करणार नाहीत तर तुम्हाला कोण कशालाच कर्ज देण्याच्या भानगडीत पडेल. जेव्हा तुम्ही नियमित क्रेडिट कार्डचा वापर करता तेव्हा तुमचा युटीलायझेशन स्कोर वाढतो आणि याचा नकारात्मक परिणाम तुमच्या CIBIL Score वर होतो. जर तुमच्या क्रेडिट कार्ड एक लाखांचा आहे आणि तुम्ही त्यातली चाळीस हजारांची रक्कम आधीच खर्च केली असेल तर तुमचा युटीलायझेशन स्कोर 40% असतो. साधारणतः हा स्कोअर 30% च्या आत असावा अन्यथा CIBIL Score नकारात्मक होतो आणि भविष्यात पुन्हा कर्ज मिळवण्यास अडचणी उद्भवू शकतात.
जर तुम्ही खर्च केलेली पूर्ण रक्कम न भरता फक्त बँकेकडून निश्चित करण्यात आलेली किमान रक्कम भरली तर त्या शिल्लक रकमेवर व्याज आकारण्यात येतो. त्यामुळे शक्यतो आपातकालीन परिस्थितीतच क्रेडिट कार्ड वापरणे योग्य ठरते. प्रत्येक खर्चासाठी क्रेडिट कार्ड वापरला आणि पैसे वेळेवर परत केले नाहीत तर आपल्याच खिशाला भेग पडतो.

