मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेत २-० असे धवल यश मिळवून जागतिक कसोटी क्रमवारीत बांगलादेशला मागे टाकण्याची भारतास संधी होती; मात्र मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारतास बाराऐवजी चार गुणांवरच समाधान मानावे लागले. या गमावलेल्या आठ गुणांमुळे भारताचा जागतिक कसोटी विजेतेपद लढतींसाठी पात्र ठरण्याचा मार्ग खूपच खडतर झाला आहे. यावर बोलताना कर्णधार शुभमन गिल याने जगज्जेतेपदासाठी संधी असल्याचं म्हणत फॉलोऑन देण्याच्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली आहे.
‘भारतीय क्रिकेटसंघाला अजूनही कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीस पात्र ठरण्याची संधी आहे, यावर आमचा विश्वास आहे,’ असं शुभमन गिलम्हणाला, त्याच वेळी त्याने भारतीय संघाने विजयासाठी कसोशीने प्रयत्न केल्याचे ठामपणे सांगितले; त्याचबरोबर फॉलोऑन देण्याच्या निर्णयाचेही समर्थन केले.
IND vs SL Test : भारत कुठे कमी पडला? श्रीलंकेच्या एकाच खेळाडूने 420 मिनिटांत 264 बॉल खेळले अन् गेम फिरला WTC पॉइंट टेबलमध्ये झटकाभारतीय गोलंदाजांना जबाबदार धरण्यासही गिलने नकार दिला. ‘आम्ही सुरुवातीस आक्रमक गोलंदाजी केली; मात्र प्रत्येक दिवसागणिक खेळपट्टी संथ होत गेली. या परिस्थितीत फलंदाज त्रिफळाचीत आणि पायचीत होण्याची शक्यता दुरावते. फलंदाजही हे जाणून होते. दोन प्रकारे आपण बाद होणारच नाही हे कळल्यावर फलंदाज अधिक आत्मविश्वासाने खेळतात. चेंडू सहज बॅटवर येत असल्यामुळे फलंदाजी सोपी झाली. आम्ही प्रयत्न केले; पण त्यांनीही चांगली फलंदाजी केली. या निकालामुळे अर्थातच आम्ही निराश आहोत,’ असे गिलने नमूद केले.
भारताच्या सात कसोटी शिल्लक असून, या सर्व जिंकल्यास भारताचे ७०.३७ टक्के गुण होतील, तर सहा जिंकल्यास ६५ टक्के, या सातपैकी पाच कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. ते सध्या आघाडीवर आहेत. भारताने ही मालिका जिंकल्यास ऑस्ट्रेलियाचे गुण कमी होतील; मात्र न्यूझीलंडविरुद्धची मालिका त्यांच्या देशात खेळण्याचे आव्हान भारतासमोर आहे. समजा भारत न्यूझीलंडमध्ये ०-२ पराभूत झाल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५-० यश आवश्यक ठरेल. या परिस्थितीत ५९.२६ टक्के गुण होतील; मात्र या परिस्थितीत अंतिम लढतीच्या पात्रतेसाठी भारतास न्यूझीलंड; तसेच दक्षिण आफ्रिकेची पीछेहाट आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मालिका ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत. न्यूझीलंड संघ पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया; तसेच श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा