Headlines

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:चांगले बोलणे ऐकण्याचीही ‎आध्यात्मिक मोहीम असावी‎




आपला आत्मा आपल्याशी बोलत असतो, पण आपण ते ऐकू शकत‎ नाही, ही गोष्ट वेगळी. आयुर्वेद विज्ञान सांगते की, निसर्गात जी‎पंचतत्त्वे आहेत, तीच आपल्या आतही आहेत. ध्वनीचे प्रतिनिधित्व‎ आकाश करते. एक आकाश आपल्या आत आहे, तर एक आकाश‎बाहेर. जे लोक बाहेरच्या आकाशावर लक्ष केंद्रित करतात, त्याचा ‎ध्वनी ऐकतात, त्यांना जगातल्या भौतिक गोष्टी मिळतील, पण जर‎ आपण आतल्या आकाशावर लक्ष केंद्रित केले, तर आपले मन शून्य ‎होईल. आपण नादब्रह्म ऐकू शकू आणि आपल्याला आपल्याच आत‎ असलेला परमेश्वर गवसेल. त्यामुळे निसर्गाकडून आपण काय घेऊ‎ शकतो, हेच आपल्याला समजत नाही. जसे आजही अनेक वृद्ध लोक‎बाजारात तारुण्य विकत घ्यायला निघतात, बालपण उधार घ्यायला‎ निघतात, तर ते त्यांना मिळेल का? पृथ्वी, जल, अग्नी आणि वायूचा‎तर आपण आधीच दुरुपयोग केला आहे. आता आपण ध्वनी‎ प्रदूषणाच्या क्षेत्रातही प्रवेश करत आहोत. ध्वनीचा संबंध बोलण्या‎ आणि ऐकण्याशी आहे. ‘चांगले बोला आणि चांगले ऐका’ याचीही ‎एक आध्यात्मिक मोहीम सुरू व्हायला हवी.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत