ICC Test Ranking News : आयसीसी रँकिंग जाहीर झाले असून यॉर्कर किंग बुमराहला झटका बसला आहे. जस्सीने पहिले स्थान गमावले असून नंबर वन कोण? विशेष म्हणजे पहिली कसोटी जिंकूनही भारतीय गोलंदाजांना तोटा झालाय, जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयसीसी कसोटी रँकिंग जाहीर झाली असून ताज्या क्रमवारीनुसार भारताचा हुकमी गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहला मोठा फटका बसला आहे. बुमराहने कसोटीमधील नंबर वन गोलंदाजाचे स्थान गमावले असून पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मिचेल स्टार्क याने दोन स्थानांनी प्रगती केली. आॉस्ट्रेलिया आणि बांगलादेशमध्ये पार पडलेली कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सुटली. या मालिकेत मिचेल स्टार्क याने २ सामन्यात १२ विकेट नावावर केल्या होत्या. यामधील दुसऱ्या कसोटीमध्येच स्टार्कने १० विकेट नावावर केल्या होत्या. या १० विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने बांगलादेश संघावर १ डाव आणि ५१ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे जसप्रित बुमराह हा आता कितव्या स्थानी गेलाय जाणून घ्या.
जसप्रित बुमराहने गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२५ पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. आता झालेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यातही बुमराह खेळला नव्हता. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने त्याला कसोटी मालिकेत खेळता आले नाही. तरीसुद्धा बुमराहकडेच कसोटी नंबर वन गोलंदाचाचा मुकूट होता. मात्र आता स्टार्कने दमदार कामगिरीच्या जोरावर मुसंडी मारलीय. त्यामुळे बुमराह हा दुसऱ्या स्थानी गेला आहे. बुमराह आणि स्टार्कमध्ये १० गुणांचा फरक असून स्टार्क हा पहिल्यांदा कसोटी नंबर वन गोलंदाज झाला असून त्याचे ८७२ गुण आहेत.
Anaya Bangar News : BCCIकडून प्रतिसाद नाही, मग ऑस्ट्रेलियाकडे धाव; अनायाला महिला संघात क्रिकेटची संधी कशी मिळाली? रिपोर्ट ठरला महत्त्वाचा जसप्रित बुमराहचे ८६२ गुण झाले आहेत. तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड संघाचा मॅट हेन्री ८६१ गुण, चौथ्या स्थानी पॅट कमिन्स आला असून त्याने एका स्थानाने प्रगती केली आहे. कमिन्सने ८४१ गुणांसह दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सेनला मागे टाकले आहे. कमिन्सनेही बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत दोन सामन्यात ७ विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीचा त्याला फायदा झाला असून चौथ्या स्थानी आला आहे. पहिली कसोटी जिंकल्यावरही भारताचे गोलंदाज मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजा हे रँकिंगमध्ये खाली गेले आहेत. सिराज १४ वरून १८ व्या स्थानी तर जडेजा १६ वरून १९ व्या स्थानी गेला आहे. तर दुसरीकडे पहिला सामना गमावल्यावरही श्रीलंकेचे वेगवान गोलंदाज असिथ फर्नांडो पाच स्थानांची प्रगती करत २० वरून १५व्या स्थानी तर प्रभात जयसूर्याही २१ वरून १६ व्या स्थानी पोहोचला आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा