Headlines

पाकिस्तानच्या कराचीत हे कोकणी कुटुंब बनवतंय सराळे,पण नक्की काय आणि कसा बनतो हा पदार्थ – konkani family in karachi pakistan is making sarawle or sarole but what is this traditional dish


पाकिस्तानातील कराची शहरात राहणाऱ्या कोकणी कुटुंबांकडून आजही ‘सराळे’ किंवा ‘सरोळे’ हा पारंपरिक पदार्थ आवडीने बनवला जातो.दिसायला पास्तासारखा वाटणारा हा पदार्थ गोड किंवा तिखट अशा दोन्ही प्रकारे तयार केला जातो आणि कोकणी खाद्यसंस्कृतीची आठवण जपतो.

कोकणी पारंपरिक रेसिपी
फोटो सौजन्य :- @Asma Dhanshe, @desi.explorer2
पाकिस्तान म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर बिर्याणी, कबाब, निहारी यांसारखे पारंपरिक पदार्थ येतात. मात्र याच पाकिस्तानातील कराची शहरात आजही एका कोकणी कुटुंबाच्या स्वयंपाकघरात महाराष्ट्राच्या कोकणाशी नातं सांगणारा एक आगळावेगळा पारंपरिक पदार्थ आवर्जून बनवला जातो ‘सराळे’ किंवा ‘सरोळे’.

सोशल मीडिया अकाउंट desi.explorer2 वर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमुळे या खास पदार्थाची चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या एका कोकणी कुटुंबाशी संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये आजही अनेक कोकणी कुटुंबे राहतात आणि सण-समारंभाच्या दिवशी ही मंडळी एकत्र येऊन सराळे (सारवले किंवा सरोळे) हा पारंपरिक पदार्थ बनवतात.

पहिल्यांदा सराळे पाहिल्यावर ‘हा नेमका पदार्थ आहे तरी काय?’ असा प्रश्न नक्कीच पडतो. त्याचा आकार काहीसा पास्तासारखा दिसत असला, तरी त्यामागची पारंपरिक बनवण्याची पद्धत, खास चव आणि कोकणी संस्कृतीशी जोडलेलं नातं यामुळे हा पदार्थ अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. सीमेपलीकडे राहूनही आपल्या मातीतल्या खाद्यपरंपरा जपणाऱ्या या कुटुंबाची गोष्ट निश्चितच लक्षवेधी आहे. आता हा पदार्थ कसा बनतो असा प्रश्न जर तुमच्या मनात पडला असेल तर Asma Dhanshe यांनी शेअर केलेली हे रेसिपी नक्की पाहा (फोटो सौजन्य :- @Asma Dhanshe, @desi.explorer2)

पाकिस्तानातील कोकणी पदार्थ सराळे किंवा सरोळे

पाकिस्तानातील कोकणी पदार्थ सराळे किंवा सरोळे

सराळे किंवा सरोळे हा कोकणातील पारंपरिक पदार्थ असून त्याचा संबंध कोकणी खाद्यसंस्कृतीशी जोडला जातो. विशेष म्हणजे पाकिस्तानातील कराची शहरात राहणाऱ्या काही कोकणी कुटुंबांमध्येही हा पदार्थ आजपर्यंत जपला गेला आहे. सण-समारंभ किंवा खास प्रसंगी कुटुंबीय एकत्र येऊन सराळे बनवतात. हा पदार्थ गोड तसेच तिखट अशा दोन्ही प्रकारे तयार केला जाऊ शकतो. गोड सराळे बनवताना साखर, तूप, अंडी, वेलची, दालचिनी आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरले जातात. दिसायला काहीसे पास्त्यासारखे वाटणारे सराळे चवीला मात्र वेगळे असून त्यामागे कोकणी परंपरेची खास चव आणि आठवण दडलेली आहे. देश बदलला तरी आपल्या पूर्वजांची खाद्यपरंपरा आणि संस्कृती जपण्याचा हा एक सुंदर नमुना म्हणता येईल.

सराळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

सराळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

गोड सराळे तयार करण्यासाठी खालील साहित्याची आवश्यकता आहे:
सराळे – ३०० ग्रॅम किंवा ३ कप
साखर – १५० ग्रॅम किंवा १ कप (चवीनुसार)
तूप – ४ टेबलस्पून
अंडी – ४
मीठ – चवीनुसार
ड्रायफ्रूट्स – आवश्यकतेनुसार (ऐच्छिक)
पाणी – ५ कप
दालचिनी – २ काड्या
वेलची पावडर – ½ टीस्पून
वेलची – ३

गोड सराळे कसे बनवायचे?

गोड सराळे कसे बनवायचे?

सर्वप्रथम एका भांड्यात ५ कप पाणी घ्या. त्यात दालचिनीच्या काड्या आणि वेलची घालून पाणी उकळून घ्या. यामुळे पाण्याला मसाल्यांचा सुंदर सुगंध येतो.यानंतर त्यात सराळे घालून ते व्यवस्थित शिजवून घ्या. सराळे मऊ झाले की त्यातील अतिरिक्त पाणी आवश्यक असल्यास काढून टाका.

कोकणी पारंपरिक पदार्थ

कोकणी पारंपरिक पदार्थ

आता एका कढईत ४ टेबलस्पून तूप गरम करा. त्यात शिजवलेले सराळे घालून हलक्या हाताने परतून घ्या. त्यानंतर चवीनुसार साखर आणि थोडे मीठ घाला.

पाकिस्तानातील कोकणी पदार्थ

कोकणी पदार्थ

कोकणी पदार्थ

साखर वितळून मिश्रणाला छान गोडवा आला की त्यात ४ फेटलेली अंडी हळूहळू घालून सतत हलवत राहा.अंडी व्यवस्थित शिजेपर्यंत मिश्रण परतत राहा. शेवटी वेलची पावडर घालून सर्व साहित्य एकजीव करा. आवडीनुसार वरून बदाम, काजू, मनुका किंवा इतर ड्रायफ्रूट्स घालू शकता.

कोकणी पारंपरिक रेसिपी

कोकणी खाद्यपरंपरेची खास ओळख

कोकणी खाद्यपरंपरेची खास ओळख

सराळे हा पदार्थ केवळ एक रेसिपी नसून त्यामागे कोकणी खाद्यसंस्कृती आणि परंपरेची आठवण जोडलेली आहे. पाकिस्तानमध्ये राहूनही कोकणी कुटुंबांनी आपल्या पारंपरिक पदार्थांची चव आणि पद्धत जपून ठेवली आहे, ही बाब विशेष आहे. आज सोशल मीडियामुळे अशा अनेक पारंपरिक आणि स्थानिक पदार्थांची माहिती जगभरातील लोकांपर्यंत पोहोचत आहे. सराळ्याच्या या रेसिपीमुळे कोकणातील खाद्यपरंपरेची एक वेगळीच बाजू अनेकांना समोर आली आहे.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा