Chinmayee Sumeet On Marathi Language : मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी एका मुलाखतीत मराठी भाषा सक्तीवर भाष्य केलं आहे. तसेच अभिनेत्रीनं यासंदर्भातील अनुभवही सांगितला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलण्याची सक्ती करण्यात आलीये. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आहे. अशातच आता मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मराठी सक्तीवर भाष्य केलं असून त्यांचा अनुभव शेअर केला आहे.
मराठी भाषा सक्तीवर काय म्हणाल्या चिन्मयी सुमीत?
एका मुलाखतीत चिन्मयी सुमीत म्हणाल्या की, ‘रिक्षा आणि टॅक्सी चालक हे खूप सॉफ्ट टार्गेट आहेत. कारण ही जी हातावर पोट असणारी माणसं आहेत ज्यांना आपण पकडून म्हणतो आहोत की तुम्ही मराठी शिका. अर्थात हे सांगायची गरज पडावी असं मला वाटत नाही. कारण भाषा हे संवादाचं माध्यम असतं आणि संवाद कशासाठी लागतो तर आपले दैनंदिन व्यवहार करायला, त्यामुळे जर वीस-पंचवीस वर्ष तुम्ही एखाद्या ठिकाणी राहून तुमचा चरितार्थ चालवत असाल तर ती भाषा तुम्ही स्वीकारणं, तुम्ही ती शिकणं हे नैसर्गिक रित्या व्हायला पाहिजे, असं मला वाटतं. ती कोणी सक्ती करायची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ही सक्ती करायला लागते हेच फार दुर्दैव आहे.’
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
स्वतःचा अनुभव सांगताना चिन्मयी म्हणाल्या की, ‘माझा एक अनुभव मी सांगते. मी मुंबईतील एका प्रतिष्ठित अशा जिममध्ये जायचे. आपल्या मुंबईमधील धनाड्य समाजातील काही गुजराती महिला सुद्धा त्या जिममध्ये होत्या. त्या अगदी मोकळेपणानं रिसेप्शन वरच्या माणसाशी किंवा ट्रेनरशी त्यांच्या भाषेत बोलायच्या. एवढंच नाही तर अगदी मोरे, चव्हाण आडनाव असलेली आपली मंडळी त्यांच्याशी गुजरातीत संवाद साधायची. पण मी मात्र त्यांना काही मराठीत विचारलं तर मला मात्र इंग्रजीत उत्तर दिलं जायचं. मग मी त्यांना एकेदिवशी विचारलं की, अरे त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलता मग माझ्याशी का नाही आपल्या मराठी भाषेत बोलत? तुमची माझी भाषा पण सारखी आहे. तेव्हा मला समजलं की त्यांना जिममध्ये मराठी बोलायची नाही, असं सांगण्यात आलेलं. कारण मराठी ही डाऊनमार्केट भाषा आहे, असं त्यांना सांगितलेलं.’
Himani Shivpuri : ‘माझ्या पतीचं निधन झालंय अन् तो पोलीस अधिकारी माझ्या भुमिकेबद्दल बोलत होता’, लोकप्रिय अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग ‘याठिकाणी समजा असा जरी नियम असता की, इंग्रजी शिवाय तुम्ही इथं दुसऱ्या कोणत्या भाषेत बोलू नका असं केलं असतं तरी एकवेळ मी समजून शकले असते. कदाचित पण तुम्हाला गुजरातीत बोललेलं चालतंय आणि मराठीत बोललेलं चालत नाही ते सुद्धा महाराष्ट्रात हे फार चुकीचं आहे. तसेच तुम्हाला एखाद्या कंपनीकडून फोन येतो तेव्हा ते मराठीमध्ये बोलत नाहीत. त्यांच्यावर कोण सक्ती करणार आहे का? मोठ्या संस्थेतील लोक मराठी बोलायला नकार देतात, त्यांच्यावर कोण सक्ती करणार नाही.’ असं चिन्मयी यांनी शेवटी सांगितलं. ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत चिन्मयी सुमीत बोलत होत्या.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा