![]()
आमच्या सरकारने 2021 मध्ये निपुण भारत अभियानसुरू केले, तेव्हा आम्ही एक उद्दिष्ट निश्चित केले. ते सांगायला सोपे होते; पण साध्य करायला कठीण होते.भारतातील प्रत्येक मूल तिसरी पूर्ण होईपर्यंत आकलना सहवाचू शकेल आणि गणितातील मूलभूत उदाहरणे सोडवूशकेल, हेच त्या अभियानाचे ध्येय होते. पाच वर्षांनंतरउपलब्ध पुरावे सांगतात की, भारताने प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात शांतपणे पण परिवर्तन घडवूनआणणारी वाटचाल सुरू केली आहे. आज भारताने जगातील सर्वात मोठ्या शालेय शिक्षणव्यवस्थांपैकी एक व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेत25 कोटी विद्यार्थी, 98 लाख शिक्षक आणि 15 लाखशाळांचा समावेश आहे. या माध्यमातून जवळपास प्रत्येकमुलाला शाळेत पोहोचवण्यात यश आले. मात्र ही केवळसुरुवात होती. अनेक वर्षे मोठ्या संख्येने मुले मूलभूतसाक्षरता न मिळवता पुढील वर्गात जात राहिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने या समस्येची ‘अध्ययनसंकट” म्हणून नोंद घेतली. त्यावर उपाय म्हणून निपुणभारत अभिया सुरू करण्यात आले. या अभियानासाठीआवश्यक संसाधनांचीही तरतूद करण्यात आली.अभियानाच्या प्रारंभी सुमारे 2,000 कोटी रुपयांचे वार्षिकबजेट होते. ते आता वाढून सुमारे 4,800 कोटी रुपयांपर्यंतपोहोचले आहे. या अभियानाचे सुरुवातीचे परिणामउत्साहवर्धक आहेत. देशभरात प्राथमिक शिक्षणाच्याक्षेत्रात शांतपणे मोठा बदल घडत असून त्याची नोंदराष्ट्रीय मूल्यमापन आणि स्वतंत्र अहवालांमध्येही झालीआहे. एनसीईआरटीच्या परख मूल्यमापनानुसारतिसरीच्या विद्यार्थ्यांना भाषेत सरासरी 64 टक्के, तरगणितात 60 टक्के गुण मिळाले. या निष्कर्षांना दुजोरादेताना असर-2024 अहवालात गेल्या दोन दशकांतीलप्राथमिक शिक्षणातील सर्वाधिक वेगवान सुधारणाभारतात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. साधीबेरीज-वजाबाकी करू शकणाऱ्या तिसरीतील विद्यार्थ्यांचेप्रमाण सुमारे 34 टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेचतिसरीतील सुमारे 23.4 टक्के विद्यार्थी दुसरीचा धडासहज वाचू शकतात. हे प्रमाण 7.1 टक्के गुणांनी वाढलेआहे. मात्र, सर्वात उत्साहवर्धक बाब या राष्ट्रीयसरासरीच्या मागे दडलेली आहे. ग्रामीण भागातील मुलेआता प्राथमिक वर्गांमध्ये शहरी विद्यार्थ्यांपेक्षा चांगलीकामगिरी करत आहेत. मुलींची कामगिरीही मुलांपेक्षासरस आहे. दुर्गम आणि संसाधनांच्या कमतरतेने ग्रस्तभागातील मुलांपर्यंतही हे अभियान पोहोचत आहे. त्यामुळेशिक्षणातील दीर्घकालीन विषमता कमी करण्यास मदतहोत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही प्रगतीयोगायोगाने घडलेली नाही. त्यासाठी नियोजनबद्ध आणिसंरचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यासुधारणांमुळे प्राथमिक शिक्षणाची संपूर्ण व्यवस्थाबदलली आहे. कमी खर्चातील शिक्षण-अध्ययन साहित्य(टीएलएम) वापरून शिक्षण अधिक रंजक आणिपरिणामकारक करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश हे याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे इयत्ता पहिलीते तिसरीसाठी सर्वसमावेशक टीएलएम व्यवस्था विकसितकरण्यात आली आहे. त्यात मुद्रित साहित्याने समृद्धवर्गखोल्या, कार्यपुस्तिका आणि खेळावर आधारितवंडरबॉक्स यांचा समावेश आहे. लहान वयातच वाचन,तर्कशक्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता आत्मसातकरणारे मूल पुढे जाऊन सक्षम मनुष्यबळाचा भाग बनतेआणि देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करते.त्यामुळे विकसित भारताच्या संकल्पनेत प्राथमिकशिक्षणाला केंद्रस्थानी स्थान देण्यात आले आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
Source link
डॉ. सुकांत मजुमदार यांचा कॉलम:आज शिकणारे प्रत्येक मूल देशाचे भवितव्य बळकट करत असते
