- Marathi News
- Opinion
- Will Pakistan Shrink To Punjabistan? Balochistan Independence Crisis Explained
48 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी 44 टक्के भागबलुचिस्तानमध्ये आहे. या प्रदेशात सुमारे 1.4 कोटीविखुरलेली लोकसंख्या राहते. ती पाकिस्तानच्या 25कोटींहून अधिक लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे.मार्च 1948 मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानवर ताबामिळवल्यापासून हा प्रांत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहे.1947 च्या फाळणीच्या वेळी बलुचिस्तान हे ‘कलात’नावाचे स्वतंत्र संस्थान होते. त्याचे शासक मीर अहमदयार खान होते. पाकिस्तानने कलातवर पाकिस्तानमध्येविलीन होण्यासाठी दबाव आणला. नंतरच्या सातदशकांपासून बलुच नेतृत्व व पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांतीलसंबंध सतत तणावपूर्ण राहिले. पाकिस्तानपासूनस्वातंत्र्याच्या मागणीसाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने(बीएलए) गेल्या काही आठवड्यांत पाकिस्तानीलष्करावरील हल्ले तीव्र केले आहेत. 5 जुलै रोजीबीएलएच्या लढवय्यांनी बलुचिस्तानातील झियारतजिल्ह्यात मंगी धरणाच्या सुरक्षेसाठी तैनात नऊ पोलिसांचीहत्या केली. 8 जुलै रोजी बीएलएच्या कट्टरवाद्यांनीपाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर घात लावून हल्लाकेला. त्यात 11 सैनिक ठार झाले. त्यानंतर मस्तुंगजिल्ह्यातही पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यावर बॉम्बहल्लाकरण्यात आला. या हल्ल्यात अंदाजे 45 सैनिकांचा मृत्यूझाला. प्रतिकात्मक पाऊल म्हणून बलुच नेत्यांनीपाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा करत आपल्यादेशाचे नाव ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ असे जाहीरकेले आहे. मात्र या दाव्याला अद्याप कोणत्याही देशानेमान्यता दिलेली नाही. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे कीचीन आणि अमेरिका या दोघांच्याही शांततापूर्ण बलुचिस्तानमध्ये स्वारस्य आहे. चीन ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) अंतर्गत चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (सीपेक) उभारून बलुचिस्तानमध्ये पायाभूत सुविधा विकसित करत आहे. तर अमेरिका बलुचिस्तानातील महत्त्वाच्या खनिजसंपत्ती,सोने-तांब्याच्या खाणी आणि तेलसंपत्तीपर्यंतपोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतही या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. स्थानिक बलुच नेते मीर यार बलुच यांनी ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’चे राष्ट्रगीत प्रसिद्ध केले असून नवी दिल्लीत बलुचिस्तानचा दूतावास सुरू करण्याची विनंतीभारताकडे केली आहे. मात्र बलुचिस्तानची राजधानीक्वेटा परिसरातील सुरक्षा परिस्थिती अद्याप अस्थिरअसल्याने भारताने यावर सावध भूमिका घेतली आहे.1948 मध्ये ताबा मिळवल्यानंतर पाकिस्ताननेबलुचिस्तानकडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे आजहीहा पाकिस्तानातील सर्वाधिक गरीब प्रांतांपैकी एक असून जागतिक दहशतवादासाठी पोषक भूमी मानला जातो. अमेरिकेतील 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादीहल्ल्यानंतर अफगाण तालिबानचा नेता मुल्ला मोहम्मदउमर याने अफगाणिस्तानात अमेरिकेच्या नेतृत्वाखालीलनाटो सैन्याविरोधात बंडाचे नेतृत्व केले. 2001 मध्ये तोपाकिस्तानात पळून गेला व पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनीत्याला क्वेटा येथे आश्रय दिला. म्हणजेच, एका बाजूलापाकिस्तान नाटोला सहकार्य करत असल्याचे दाखवतहोता, तर दुसऱ्या बाजूला तालिबानलाही मदत करत होता.अशी दुटप्पी भूमिका पाकिस्तानी नेतृत्वाने सातत्यानेघेतली आहे. ओसामा बिन लादेनलाही जवळपासदशकभर एबटाबाद येथे लपवून ठेवण्यात आले होते.अखेर 2011 मध्ये अमेरिकेच्या नेव्ही सील्सने त्याचा शोधघेऊन त्याला ठार केले. पाश्चिमात्य देशांसाठीपाकिस्तानचे भू-राजकीय महत्त्व असल्यामुळेबलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीला व्यापकआंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे.मात्र, पाकिस्तानच्या जातीय विघटनाची ही सुरुवातमानली जात आहे. दुसरीकडे पीओकेमध्ये असंतोष वाढतआहे. खैबर पख्तूनख्वामध्ये अस्थिरता कायम आहे.बलुचिस्तानला लागून असलेल्या सिंधमध्येही पाकिस्तानीलष्कर आणि सरकारमधील पंजाबी वर्चस्वाविरोधातदीर्घकाळापासून आंदोलने सुरू आहेत. सुमारे 11.2 कोटी(44 टक्के) लोकसंख्या असलेले पंजाबी हेपाकिस्तानातील सर्वाधिक प्रभावशाली आणि समृद्धजातीय समूह आहेत. मात्र पाकिस्तानच्या केवळ 26 टक्केभूभागावर पंजाब प्रांत आहे. याउलट बलुच लोकसंख्याकेवळ 6 टक्के असली तरी बलुचिस्तानमध्येपाकिस्तानच्या 44 टक्के भूभागाचा समावेश होतो.बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि सिंधहीबांगलादेशप्रमाणे पाकिस्तानपासून वेगळे झाले तरपाकिस्तान ‘पंजाबिस्तान’ नावाचे छोटे राष्ट्र उरेल. यापूर्वीयुरोपमधील युगोस्लाव्हियाचेही अशाच प्रकारे विघटनझाले होते. दीर्घ जातीय संघर्षानंतर तेथून स्लोव्हेनिया,क्रोएशिया, सर्बिया, मॉन्टेनेग्रो, बोस्निया आणि हर्झेगोविना,उत्तर मॅसिडोनिया आणि कोसोव्हो अशी सात स्वतंत्र राष्ट्रेउदयास आली. या दोन्ही परिस्थितींमध्ये महत्त्वाचा फरकआहे. शीतयुद्ध संपल्यानंतर आणि सोव्हिएत संघाच्याविघटनानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो देशांनीभू-राजकीय धोरणाचा भाग म्हणून युगोस्लाव्हियाचेविघटन घडवून आणले. मात्र, पाकिस्तानच्या बाबतीतअमेरिकेची भूमिका देश एकसंध ठेवण्याची राहिली आहे.1947 पासून अमेरिका आणि ब्रिटन यांनी पाकिस्तानचाआपल्या भू-राजकीय हितसंबंधांसाठी वापर केला आहे.सीआयए , आयएसआय या गुप्तचर संस्थाही पडद्यामागेसमन्वयाने काम करतात, असे मानले जाते. इतिहासपाहिला तर पाकिस्तान हा अमेरिकेचा प्रमुख गैर-नाटोसहकारी राहिला आहे. 1989 पासून पाकिस्तानमार्फतभारतीय नागरिकांवर झालेल्या अनेक दहशतवादीहल्ल्यांकडे अमेरिकेने दुर्लक्ष केले. मात्र खनिजसंपत्तीनेसमृद्ध बलुचिस्तानमध्ये धुमसत असलेल्याचळवळीकडेही अमेरिका दुर्लक्ष करू शकेल का? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यचळवळीला वाढते महत्त्व…बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीलाव्यापक आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळालानसला, तरी पाकिस्तानच्या जातीयविघटनाची ही सुरुवात मानली जात आहे.पीओके आणि खैबर पख्तूनख्वामध्येहीअस्थिरता वाढत आहे. सिंधमध्ये पंजाबीवर्चस्वाविरोधात दीर्घकाळापासूनआंदोलने सुरू आहेत.

