![]()
दिल्लीच्या सत्ताकेंद्रांमध्ये कटकारस्थानांचे सिद्धांत(कॉन्स्पिरसी थिअरीज) नेहमीच फोफावत आलेआहेत. मात्र, आजच्या तीव्र ध्रुवीकरणातील भारतात तेकेवळ चर्चेपुरते राहिलेले नाहीत. आता ते राजकीयशस्त्र बनले असून विरोधकांची विश्वासार्हता डागाळणे,आंदोलने बदनाम करणे व अस्वस्थ करणाऱ्याप्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. सध्या या आरोपांचे लक्ष्य आहेत सोनम वांगचुक आणि वकॉकरोच जनता पार्टी (सीजेपी). राष्ट्रीय राजधानीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्यापार्श्वभूमीवर त्यांच्यावर आरोप होत आहेत. पेपरफुटी, परीक्षांतील विलंब आणि बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये असंतोष का आहे, हा प्रश्न विचारण्याऐवजी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या उद्देशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काँग्रेसशी संबंधित काही गटांमध्ये असा दावा केला जात आहे की वांगचुक आणि सीजेपी हे सरकारच्यातथाकथित “डीप स्टेट’ चा भाग आहेत. नीट वादाचेराजकीय श्रेय काँग्रेसला मिळू नये, म्हणून त्यांना पुढेकरण्यात आले, असा आरोप केला जात आहे. मात्र, यादाव्याला कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. तरीही,संशयाचे वातावरण तथ्यांपेक्षा वेगाने पसरत असल्यानेअसे कटकारस्थानांचे सिद्धांत सहज रुजतात. सोनम वांगचुक यांच्या प्रकरणाकडे पाहिले तरलडाखला अधिक स्वायत्ततेची मागणी करणारेआंदोलन तीव्र झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय सुरक्षाकायद्याअंतर्गत (एनएसए) ताब्यात घेण्यात आले होते.त्यांनी सहा महिने तुरुंगात घालवले. नंतर त्यांची सुटकाझाली; मात्र त्यांना का अटक करण्यात आली, याचेस्पष्ट कारण कधीच सांगण्यात आले नाही. त्यांच्यावरचीनसमर्थक एजंट असल्याचेही आरोप करण्यात आले. दुर्देव असे की पूर्वी चीनसमर्थक म्हणून बदनाम करण्यातआले. त्याच व्यक्तीला आता काही नेते गुप्तचर यंत्रणेचीकठपुतळी म्हणत आहेत. काँग्रेसच्या आंदोलनाकडूनलक्ष विचलित करण्यासाठी सरकारने त्यांना पुढे केले,असा आरोप केला जात आहे. एखाद्या व्यक्तीवर आधीचीनसमर्थक असल्याचा आणि नंतर भारतीयसत्तासंस्थेसाठी काम करत असल्याचा आरोप एकाचवेळी कसा खरा ठरू शकतो, हा प्रश्न उपस्थित होतो. मीसोनम वांगचुक यांना जवळपास दोन दशकांपासूनओळखतो. 2008 मध्ये शिक्षण आणि पर्यावरणक्षेत्रातील कार्यासाठी त्यांना ‘रिअल हिरो” पुरस्कारमिळाला, तेव्हा माझी त्यांच्याशी पहिली भेट झाली होती. ‘थ्री इडियट्स” हा चित्रपट त्यांच्या आयुष्यापासून प्रेरितअसल्याचे अनेकांचे मत आहे. त्यांच्या प्रत्येक मताशीसहमत असणे आवश्यक नाही. मात्र, लोकशाहीचामूलभूत सिद्धांत असा आहे की सत्तेशी मतभेद असणेम्हणजे देशद्रोह नव्हे. केंद्र सरकारनेही अनेक प्रसंगीजाहीररित्या वांगचुक यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.मार्च 2023 मध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीवांगचुक आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर‘एक्स”वर छायाचित्र शेअर करत शिक्षणव्यवस्थेत बदलघडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.आता नीट प्रकरणी उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्याप्रमुख चेहऱ्यांपैकी झाल्यानंतर प्रशंसा दिसेनाशी झाली. सरकारने सीजेपीकडे इंटरनेटपुरत्या छोट्या गटाप्रमाणेपाहिले. मात्र विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यावरच त्यांच्याअस्तित्वाची दखल घेतली गेली. काँग्रेसलाही सीजेपी हा आम आदमी पक्षाचाच मुखवटाअसल्याचे वाटत होतेय कारण त्याच्या संस्थापकाचापूर्वी आपशी संबंध होता. कदाचित 2011 मधील अण्णाहजारे यांच्या आंदोलनामुळे काँग्रेस सरकारच्या पतनाचीप्रक्रिया वेगाने सुरू झाल्याची आठवण काँग्रेसलाआजही असावी. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) काँग्रेसशी संबंधित काही गटांत एकसिद्धांत मोठ्या प्रमाणावर मांडला जातआहे की, वांगचुक आणि सीजेपी हेसरकारच्या कथित “डीप स्टेट”चा भागआहेत. नीट वादाचा मुद्दा मांडण्याचे श्रेयकाँग्रेसला मिळू नये, म्हणूनच त्यांना पुढेकरण्यात आले आहे.
Source link
राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:कटाच्या सिद्धांतांना सत्यावर कधीही वर्चस्व गाजवू देऊ नका
