Jui Gadkari post: आमची म्हातारी ७०रीची झाली असती,आज खा तुला हवं तितकं गोड! लाडक्या सायलीची ‘पूर्णा आजी’साठी भावुक पोस्ट, तेजस्विनीच्या कमेंटनं वेधलं लक्ष
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनाच्या संकटात अडकलेली राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेखसुखरूप मुंबईत परतली आहे. भूतानहून काठमांडू मार्गे भारतात परतत असताना नेपाळमधील निसर्गाच्या तांडवाचा सामना करावा लागल्याचं तिनं सांगितलं. नेपाळहून परत येणं म्हणजे एखादं युद्ध जिंकल्यासारखं वाटलं, अशा शब्दांत तिनं आपला थरारक प्रवास सांगितला.
मानसी कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेली होती. ती नुकतीच भारतात परतली असून तिनं तिचा अनुभव शेअर केलाय. तिबेट आणि नेपाळच्या मध्ये एक बॉर्डर आहे. तिथं एक इमीग्रेशन बिल्डिंग आहे. सात दिवसांपूर्वी आम्ही त्याच इमीग्रेशन बिल्डिंग चीनमध्ये प्रवेश केलेला. आमची कैलास यात्रा संपल्यानंतर आम्ही तिथून निघणार होतो. पण त्यानंतर 24 तासांपूर्वी ही घटना घडली. आम्हाला काहीच कळत नव्हतं की, काय झालंय.काय करायला हवं? जे गाव पाहिलं ते संपूर्ण गाव वाहून गेलेलं. तिथं फक्त चिखल होता. या चिखलातून लोकांना बाहेर काढणं सोपं नव्हतं. तब्बल ३०० किमीपर्यंत लोक वाहत गेली होते. हे सगळं खूप भयंकर, भीतीदायक आणि दु:खज होतं, असंही मानसीनं सांगितलं.
मानसी पारेखने सांगितला काठमांडूतील पुराचा भीषण अनुभव
मानसी आणि तिच्या सहकाऱ्यांनी भूतानचा प्रवास संपवून भारतात परतण्यासाठी काठमांडूचा मार्ग निवडला होता. मात्र, काठमांडूत पोहोचताच मुसळधार पावसामुळं नद्यांना आलेला पूर आणि ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळं सर्व रस्ते बंद झाले होते. अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल ४ ते ५ तास वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागल्याचं तिनं सांगितलं.
पुरामुळं महामार्ग खचले होते आणि अनेक विमान उड्डाणे रद्द झाली होती. फोन नेटवर्क आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळं कुटुंबाशी संपर्क साधणे कठीण झाले होतं, असं मानसीनं सांगितलं.हॉटेलच्या बाहेर पाण्याचा प्रवाह इतका वेगात होता की कुठल्याही क्षणी परिस्थिती अधिक बिघडू शकत होती, असं म्हणत तिनं परिस्थितीचं वर्णन केलं.
Taarini Shooting at Wagah Attari Border: ‘ती अचानक माझ्याजवळ आली आणि तिनं सांगितलं की, ती ‘तारिणी’ पाहते’, शिवानी सोनारने सांगितला अटारी बॉर्डरवरचा खास किस्सा
‘आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, तिथं वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला होता. बाहेरचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. नेमकं काय करायचं आणि भारतात कसं परतायचे, याची अजिबात कल्पना येत नव्हती’, मानसी पारेख म्हणाली.
भारतात परतण्याचा खडतर प्रवास
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मानसी आणि तिच्या टीमनं स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं सुरक्षित मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर काठमांडू विमानतळ मर्यादित वेळेसाठी सुरू झाल्यानंतर, प्रयत्न करून त्यांनी विमानाचं तिकीट मिळवलं आणि भारतात सुरक्षित प्रवेश केला.
मुंबईत पाऊल ठेवल्यानंतर मानसीनं सुटकेचा निःश्वास सोडला. जेव्हा आम्ही मुंबई विमानतळावर उतरलो, तेव्हा खऱ्या अर्थां जीवात जीव आला. तिथून सुरक्षित बाहेर पडणं हे एखाद्या मोठ्या युद्धापेक्षा कमी नव्हतं, असे मानसीने नमूद केलं. तिने नेपाळमधील पुराच्या भीषण परिस्थितीवर चिंता व्यक्त करत तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थनाही केली आहे.
२० हजार सुरक्षा कर्मचारी शोध व बचावकार्य करत आहेत
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, पूरग्रस्त भागांत सुमारे २० हजार सुरक्षा कर्मचारी शोध व बचावकार्य करीत असून, रविवारी ८,७३० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. दरम्यान, रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील नऊ जलविद्युत प्रकल्पांतील ५३७ कर्मचारी बेपत्ता आहेत. ८९८ कर्मचाऱ्यांपैकी ३६१ जणांची सुटका झाली आहे.
मध्य नेपाळमध्ये विध्वंस घडविणाऱ्या प्रलयानंतर सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेले नागरिक पुन्हा आपल्या वस्त्यांमध्ये परतण्याच्या तयारीत असताना रविवारी भोतेकोशी पाण्याच्या पातळीत वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे नेपाळ सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तिबेटमधील तलावांतून विसर्गामुळे जलप्रवाह वाढणार असल्याची माहिती चीनने दिल्यानंतर नेपाळने खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
