नागपुरचे सीए निर्मल कुमार अग्रवाल प्रकरण
नागपुरचे निर्मल कुमार व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. 2016 साली आयकर विभागाने त्यांच्या घराची तपासणी केली होती. या कारवाईत विभागाला एकूण 2.434 किलो सोन्याचे दागिने सापडले. त्यातील 1.314 किलो सोने विभागाने जप्त केले. तर सापडलेल्या 7.06 लाख रक्कमेतील 5 लाख रक्कम जप्त करण्यात आली.
सोन्याच्या स्त्रोताबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्यामुळे आयकर विभागाने जप्त करण्यात आलेल्या सोन्याला अनएक्सप्लेन उत्पन्न म्हणून घोषित केले. ही रक्कम 50 लाख इतकी होती. व्यवसायाने सीए असणाऱ्या निर्मल कुमारांनी आयकर विभागाच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यांनी केलेल्या अपीलला दिलासा मिळाला. तरीही त्यांचे 3.86 लाखांचे सोन्याचे दागिने अद्याप वादात होते.
प्रकरणाला खरे वळण ITAT मध्ये पोहचल्यावर मिळाले. सुनावणी सुरू असताना लक्षात आले की निर्मल कुमार यांच्या घरातून जप्त करण्यात आलेले दागिने त्यांच्या एकट्याचे नाही आहेत. फक्त 121.5 ग्राम सोने निर्मल यांच्या मालकीचे असून त्यातील 72.6 ग्राम सोने नोंदणीकृत आहेत. एकंदरीत, फक्त 48.9 ग्राम सोने वादात आहेत.
आईटीएटीचे म्हणणे होते की एखाद्या लग्न झालेल्या पुरुषाकडे तसेच इतर सामाजिक परिस्थितिचा विचार करता 48.9 ग्राम सोने असणे असामान्य नाही. CBDT च्या नियमांनुसार, हे सोने 100 ग्रॅमच्या मार्गदर्शक पातळीपेक्षाही फार कमी होते. त्यामुळे सोन्यावरील कर हटवण्यात आले.
अर्थतज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त पण गेल्या तिमाहीपेक्षा कमी, GDP मध्ये 7.8 टक्क्यांची वाढ! उत्पादन क्षेत्राचा आधारसीबीडीटीचे नियम काय म्हणतात?
सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. आयकर विभागाकडून आकरण्यात येणाऱ्या करांच्या संबंधित धोरणे सूचना पाहण्याचे काम सीबीडीटी करते. सीबीडीटी Instruction No. 1916 नुसार, विवाहित महिलांसाठी 500 ग्रॅम सोने, अविवाहित महिलांसाठी 250 ग्रॅम तर पुरुषांसाठी 100 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचे बेंचमार्क आहे. तरीही लक्षात घेण्याची बाब म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक दागिन्याची नोंद असणे किंवा त्यासंदर्भात काही पुरावा असणे बंधनकारक असते.

