Headlines

तरुणाचे 36 वर्षीय विवाहितेसोबत प्रेमसंबंध; प्रेम प्रकरणात तिसऱ्याच व्यक्तीला संपवलं


सोलापूरमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाचे विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेम प्रकरणातून महिलेच्या पतीने तिच्या प्रियकरावर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान तरुणाच्या मामाचा मृत्यू झाला.

Solapur News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : सोलापूर शहरातील लोकमान्य नगरात रविवारी सायंकाळी 45 वर्षीय व्यक्तीचा खून झाला आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात याबाबत अधिकृतरित्या खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. सुरुवातीला किरकोळ हाणामारीमधून खून झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. विजापूर नाका पोलीस ठाण्यात रविवार रात्री उशिरा गुन्हा नोंद झाल्यानंतर खरी माहिती समोर आली.

एका बावीस वर्षीय तरुणाचे 36 वर्षीय विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यामधून हाणामारी झाली आणि तरुणास मारहाण होताना, तरुणाचा मामा अल्ताफ बाशा शेख (वय 45 वर्षे) सोडवायला गेले. विवाहित महिलेच्या नातेवाईकांनी सोडवायला आलेल्या अल्ताफ शेखला जबर मारहाण केली. छातीत जोराने मारहाण केली, त्यामुळे अल्ताफ शेख हे जाग्यावरच कोसळले.

अल्ताफ शेख यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी अल्ताफ शेख यास मृत घोषित केले. विजापूर नाका पोलीस ठाण्यात याबाबत विवाहित महिलेचा पती मतीन गजनफर शेख, विवाहित महिलेचा भाऊ सद्दाम इनामदार, नातेवाईक मुशेब सय्यद आणि शोएब सय्यद या चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुफीयान इर्शाद शेख(वय 22 वर्षे) असे संबंधित तरुणाचे नाव आहे, हा तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

नेमकी घटना काय?

सूफीयान शेख (वय 22 वर्षे) याचे मतीन शेख याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याची कुणकुण मतीन शेख याला काही दिवसांपूर्वी लागली होती. अनैतिक संबंधाच्या संशयातून मतीन शेख हा पत्नीस वारंवार टोचून बोलत होता. या कारणावरून पती-पत्नीत नेहमी भांडण व्हायचं.

सूफीयान शेख हा रविवारी सायंकाळी मतीन शेख याच्या घरी गेला होता. त्याचवेळी अचानकपणे मतीन शेख हा घरी आला आणि सुफीयान शेख हा त्या ठिकाणी आढळून आला. यावरून मतीन शेख आणि सुफीयान शेख यांचे कडाक्याचे भांडण झाले. मतीन याने पत्नीच्या भावाला म्हणजेच सद्दाम इनामदार याला फोन वरून माहिती देत, बोलावून घेतले. सद्दाम इनामदार याने येताना लोखंडी रॉड, रबरीपाईप घेऊन नातेवाईक मुशेब सय्यद आणि शोएब सय्यद यांना घेऊन मतीनच्या घरी आला.

तरुणाच्या मामाचा मृत्यू

रविवारी सायंकाळी सहा ते साडेसहा दरम्यान सूफीयान शेख हा तरुण मामाच्या (अल्ताफ शेख) घरी गेला आणि बसला. मतीन शेख, सद्दाम इनामदार, मुशेब सय्यद, शोएब सय्यद हे चौघे, सुफीयान या तरुणाला मारहाण करण्यासाठी अल्ताफ शेख याच्या घरी गेले. सुफीयान शेख याला घरातून बाहेर काढून मारहाण करू लागले.

सुफीयान शेख या तरुणाचा मामा अल्ताफ शेख हा मारामारी करू नका, माझ्या भाच्याला मारू नका अशी विनंती करत होता. मात्र मारहाण करणाऱ्या मतीन शेख, मुशेब सय्यद, शोएब सय्यद आणि सद्दाम इनामदार यांनी सुफीयानला आणि त्याचा मामा अल्ताफ शेख याला देखील मारहाण करू लागले.

अल्ताफ शेख याच्या छातीत जोरदार लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सुफीयान याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारून जबर जखमी केले. अल्ताफ याच्या छातीत जोराचे ठोसे मारल्याने अल्ताफ शेख हा जाग्यावरच कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी ताबडतोब खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Maharashtra TimesMumbai Alibaug Ferry : मुंबई-अलिबाग जलप्रवास पुन्हा वेग घेणार; 1 सप्टेंबरपासून फेरीबोट सेवा सुरूडॉक्टरांचे उत्तर ऐकून नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. काहीही संबंध नसताना, अल्ताफ शेख यास मारहाण करून त्याचा खून केला, असा आरोप नातेवाईक करत होते. पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा सर्व तपास करून चार संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वराळे करत आहेत.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा