Headlines

फुटबॉलच्या देवाचा मैदानाला अलविदा! जगभरातील चाहत्यांना धक्का, निवृत्त होताना मेस्सीचं तीन पानी भावनिक पत्र


Lionel Messi Retirement News : लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अर्जेंटिनाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये नेल्यानंतर मेसीने हा निर्णय घेतला.

Lionel Messi Retirement
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : फुटबॉलचा जादूगार आणि देव मानला जाणारा लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अखेर अलविदा केला आहे. त्याने हा निर्णय घेतल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जुलैमध्येच अर्जेंटिनाला सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर त्याने आजरोजी सोमवारी निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या मेस्सी ३९ वर्षांचा आहे. मेस्सीने घेतलेल्या या निर्णयामुळे कोट्यवधी चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. दरम्यान, सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना मेस्साीने ही माहिती दिली. या पोस्टमध्ये त्याने तब्बल तीन पानांमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, आपल्या कारकीर्दीत अर्जेंटिनासाठी सर्वस्व पणाला लावल्याचेही त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘हा निर्णय घेताना खूप दुःख झालं’

मेसीने आपल्या पोस्टमध्ये निवृत्तीचा निर्णय अत्यंत भावनिक असल्याचे सांगितले. हा निर्णय घेताना आपल्याला खूप दुःख झाले आणि अजूनही होत असल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र, आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून बाजूला होण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मेसीने स्पष्ट केले. “मी नेहमीच माझं सर्वस्व दिलं आहे. केवळ गेल्या काही वर्षांत आम्ही जे काही जिंकलो त्यासाठीच नाही, तर त्याआधीही मी अर्जेंटिनाच्या जर्सीसाठी संघर्ष केला आणि सर्वस्व झोकून दिलं,” असं मेस्सीने म्हटलं.

Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi : वैभवनं मैदान गाजवलं! 36 वर्षांपासून अबाधित असलेला रेकॉर्ड 8 धावांनी वाचला, पण 57 वर्षे जुना रेकॉर्ड मोडत इतिहास रचलाच, नेमका कोणता?

मेस्सीची पोस्ट जशास तशी

“फायनलला इतका वेळ उलटून गेल्यानंतर, खूप विचार केल्यानंतर मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी अर्जेंटिना राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेत आहे. हा निर्णय घेताना खूप वेदना झाल्या आणि आजही मनाला त्याची वेदना होत आहे. पण आता हीच योग्य वेळ आहे, हे मला समजत आहे. मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो की, मी नेहमीच माझं सर्वस्व दिलं. केवळ गेल्या काही वर्षांत, जेव्हा आपण सर्व काही जिंकलो, तेव्हाच नाही तर त्याआधीही मी या जर्सीसाठी, या संघासाठी नेहमीच सर्वस्व पणाला लावलं. तुम्हाला आनंद देण्यासाठी आणि फुटबॉलच्या माध्यमातून अर्जेंटिनाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटावा, यासाठी मी नेहमीच संघर्ष केला.

आता फार वेळ शिल्लक नाही आणि काही काही टप्पे संपत चालले आहेत. त्यापैकी हा एक टप्पा आहे, जो मला खूप त्रास देतोय. मला अर्जेंटिना संघाचा भाग असणं आवडत होतं, आजही आवडतं आणि कायम आवडत राहील. मी माझं सर्वस्व दिलं आहे. आता माझ्याकडे देण्यासाठी काहीच उरलेलं नाही. शिवाय, माझ्या मागे काही खूपच चांगले युवा खेळाडू आहेत, जे संघात स्थान मिळवण्यास पात्र आहेत.

Maharashtra TimesIndian Cricketers : प्रेम झालं, नातं बहरलं, लग्नापर्यंत गेलेला विषय पण टीम इंडियाच्या ५ क्रिकेटर्सची प्रेमकहाणी अधुरीच राहिली, पाहा कोण?
गेल्या २० वर्षांपासून दिलेल्या प्रेमासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. मैदानाच्या आतून तुमचा आवाज ऐकण्याची मला खूप आठवण येईल. आता मी तुमच्यापैकीच एक असणार आहे. बाहेरून संघाला नेहमीच पाठिंबा देत राहीन, चांगल्या काळातही आणि वाईट काळात तर त्याहूनही जास्त.

माझ्या कुटुंबाचेही आभार. या सुंदर, पण तितक्याच कठीण प्रवासात त्यांनी नेहमी माझी साथ दिली आणि माझ्यासोबत राहिले. माझ्यासोबत काम केलेल्या प्रत्येक प्रशिक्षकाचे, सहकाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार. त्यांच्यासोबत घालवलेल्या असंख्य आठवणी आणि अविस्मरणीय क्षण मी कायम माझ्यासोबत घेऊन जाईन.

माझ्या मनात आता एकच समाधान आणि अभिमान आहे की, माझ्या सहकाऱ्यांसोबत मिळून मी तुम्हाला काही स्वप्नवत क्षण अनुभवायला दिले. हे सर्व तुमच्यासोबत जगता आलं, हीच एक वेडी करणारी अनुभूती होती. तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे.

देवा, तू मला अर्जेंटिनाचा नागरिक बनवलंस, यासाठी तुझे आभार.

चला, अर्जेंटिनासाठी लढूया!

ही पोस्ट मी २१ जुलै रोजी, फायनलच्या दोन दिवसांनंतर लिहिली होती. आता माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी या निर्णयाबाबत पूर्वीपेक्षाही अधिक ठाम झालो आहे.”

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा