Headlines

जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ असेल टॅक्स फ्री:24 तासांत पैसे खात्यावर‎, वैज्ञानिक ग्रेडिंग, ड्रायिंग अन् डिजिटल लिलावाची सुविधा




रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना ‎आता कर्नाटकच्या रामनगर‎ बाजारपेठेपर्यंत जावे लागणार‎ नाही. त्यासाठी जालन्यातच रेशीम ‎कोष बाजारपेठ विकसित करण्यात ‎आली आहे. कर्नाटकच्या ‎बाजारपेठेत 1 टक्के शुल्क‎ आकारले जाते. ते येथे माफ ‎राहणार आहे. शिवाय कोषाचे ‎वैज्ञानिक ग्रेडिंग उपलब्ध असेल.‎ड्रायिंगची अत्याधुनिक सुविधा‎ असेल. लिलाव आणि व्यवहार ‎डिजिटल होतील. येथे शेतकरी ‎आणि व्यापाऱ्यांसाठी निवासाची ‎सुविधाही उपलब्ध करून देण्यात‎ आली आहे. 14 ऑगस्ट रोजी ‎मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या‎ हस्ते या बाजारपेठेचे उद्घाटन केले ‎जाणार आहे.‎ जालना बाजार समितीत गेल्या 8‎ वर्षांपासून सुरू असलेली ही रेशीम‎ कोष बाजारपेठ आता स्वतःच्या ‎जागेत स्थलांतरित होत आहे. 14‎ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‎या बाजारपेठेचे उद्घाटन होईल.‎2018 पासून सुरू असलेल्या या ‎बाजारपेठेत आतापर्यंत 37,871 ‎शेतकऱ्यांनी रेशीम कोष विक्रीसाठी ‎आणला आहे. त्यातून 3,271.71 ‎टन कोषांची विक्री करण्यात आली ‎आहे. 154 कोटी 32 लाख रुपयांची ‎उलाढाल झाली आहे. आता ‎अडीच एकर क्षेत्रावर ही बाजारपेठ ‎उभारण्यात आली आहे.‎ तुती लागवड ते रेशीम वस्त्र जालन्यात तुती लागवड, अंडीपुंज‎निर्मिती, कीटक संगोपन, कोष उत्पादन, कोष बाजारपेठ, ऑटोमॅटिक रिलिंग,‎धागा, रंगाई, हातमाग आणि तयार रेशीम वस्त्र अशी संपूर्ण साखळी उभारली‎ जात आहे. त्यामुळे ‘तुतीच्या शेतापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत’ जालन्याचा‎ रेशीम उद्योग नेण्याचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण महिलांना हातमागाचे प्रशिक्षण देऊन‎ रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही भर दिला जात आहे.‎ लिलाव व व्यवहार डिजिटल आधुनिक लिलाव हॉल, सॉफ्टवेअरच्या ‎माध्यमातून कोष खरेदी-विक्री प्रक्रिया पारदर्शक होईल. कोषाला बाजारातील योग्य दर ‎मिळण्यास मदत होईल. गुणवत्ता तपासण्यासाठी ग्रेडिंग व कोष परीक्षण केंद्र आहे.‎ गुणवत्तेनुसार कोषाचे मूल्यांकन होईल. चांगल्या दर्जाच्या कोषाला योग्य भाव मिळेल.‎ शेतकऱ्यांसाठी निवासाची सोय‎ जालना हे महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण ‎आहे. त्यामुळे मराठवाड्यासह विविध‎ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जवळच्या बाजारपेठेत ‎कोष विक्री करता येणार आहे. येथे दूरवरून ‎येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी निवास ‎व्यवस्था करण्यात आली आहे. येथे एकाचवेळी‎ 16 शेतकरी मुक्कामासाठी थांबू शकतील.‎त्यामुळे बाजारपेठेत येऊन व्यवहार पूर्ण ‎करण्यासाठी शेतकऱ्यांना सोय होणार आहे.‎ शेतकरी केंद्रित बाजारपेठ‎ ही रेशीम कोष बाजारपेठ केवळ‎ खरेदी-विक्रीचे केंद्र नाही. ही बाजार व्यवस्था‎ शेतकऱ्यांना संपूर्ण सुविधा एकाच ठिकाणी‎ देते. येथे शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क‎ आकारले जाणार नाही. पुढील टप्प्यात ‎कोषापासून धागा, धाग्यापासून तयार‎ वस्त्रनिर्मितीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी ‎जालन्यात विकसित करण्याचे नियोजन आहे.‎
– अजय मोहिते, रेशीम विकास अधिकारी‎ एक्सप्लेनर‎ 3 हजार ‎रुपये अधिक भाव मिळणार‎ Q. सध्या व बाजारपेठेनंतर काय भाव मिळेल?‎
A. सध्या 65 हजार रुपये क्विंटल दर आहे. त्यात‎किमान 3 हजारांची वाढ होणे अपेक्षित आहे.‎ Q. इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोष‎आणण्यासाठी काय प्रक्रिया आहे?‎
A. देशातील कुठलाही शेतकरी विक्रीसाठी कोष आणू‎शकतो. रात्री उशिरा आले तर मुक्कामाची सुविधा आहे. Q. माल विकल्यानंतर पैसे किती वेळेत मिळेल?‎
A. पावती जागेवर मिळेल. पैसे 24 तासांत खात्यावर‎जमा होतील.‎ Q. बाजारपेठेतील खरेदीदार स्थानिक असेल की‎इतर राज्यांतील‌ असतील?‎
A. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल येथील खरेदीदार‎असणार आहेत.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत