Headlines

जलसुरक्षित सक्षम लातूर बनविणार;लातूरला मृदा व जलसंधारणाची घेतली शपथ, पालकमंत्र्यांनी केला संकल्प


Latur News : स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी नागरिकांशी संवाद साधताना लातूरला जलसुरक्षित सक्षम बनविण्याचा संकल्प करण्यात आला.

_ लातूरला जलसुरक्षित सक्षम बनविणार
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,लातूर : ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’च्या बोधचिन्हाचे या वेळी अनावरण करण्यात आले; तसेच उपस्थितांना मृदा व जलसंधारणाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत गायले गेले. पोलिस निरीक्षक मोहन ठोंबरे यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करण्यात आले

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच लातूरला जलसुरक्षित आणि अधिक सक्षम बनविण्याचा संकल्प पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या; तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले.

शहीद जवानांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा पाटील, लातूर महापालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महापालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra TimesMumbai Crime : तुला जायचं तर जा, मुलांना कुठेही न्यायचं नाही; मुंबईतील नौदल जवानाच्या कुटुंबाच्या मृत्यूमागे वैवाहिक वाद? दोन महिन्यांच्या बाळालाही संपवलं

कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील यादी जाहीर

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील ५४ हजार ३८८ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असून, त्यापैकी २२ हजार ९६३ शेतकऱ्यांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लवकरच हा निधी वर्ग करण्यात येईल,’ असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

Maharashtra TimesRatnagiri News: ऐन गणेश चतुर्थीला चाकरमान्यांचे हाल! मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे; आता सरकार, प्रशासनाला जाग, कधीपर्यंत काम होणार?

१५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’

‘पाण्याचे संवर्धन आणि काटकसरीने वापर ही काळाची गरज आहे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या वर्षीपासून २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ पाळला जात आहे. त्यानिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांचे आवाहन

पाण्यासाठी समाजाने एकत्र येण्याचा हा एक संकल्प आहे. युवक, विद्यार्थी, महिला बचत गट, शेतकरी आणि सामाजिक संस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त, उत्साहाने सहभाग घ्यावा,’ असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा