Headlines

latur crime young man killed by friends in ambedkar chowk amit deshmukh witness;


लातुरात नियोजनपद्धतीने एका खुनाचं प्लानिंग करण्यात आलं, त्यानंतर दोघांनी मिळून मित्राला संपवलं अन् पुढे असं काही घडलं की….

Youth stabbed to death over old rivalry in latur
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर: लातूर शहरात मागील काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मित्रानेच जुनी कुरापत उरकून काढत मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका मित्राने दुसऱ्या मित्राला चाकूने भोसकून भर रस्त्यात खून केला आहे. लातूर शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहेत. निवडणुकीच्या काळात लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख प्रचार सभा संपवून त्यांच्या मूळ गावी म्हणजे बाभळगाव निघाले असताना खुनाची घटना नुकतीच घडली होती, ते आयत्यावेळी त्या ठिकाणी आल्याने पोलिसांना तात्काळ त्यांनी सूचना दिल्या. त्यांच्यासमोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंदेला रिक्षात बसून त्याच्या मित्रांनी लातूरच्या स्वरूपच्या रुग्णालयामध्ये दाखल केले उपचार दरम्यान प्रज्वल शिंदे याचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली.

‘बऱ्याच दिवसापासून तू माझ्या डोक्यात बसलास..’

लय दिवसापासून तू मझ्या डोक्यात बसलास, असे म्हणत २९ वर्षीय तरुणावर त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने छातीत, बरगडीत, पोटात आणि मानेवर चाकूने भोसकून खुन केल्याचा प्रकार रात्री उशिरा समोर आला आहे. एकामागे एक वर्मी घाव बसल्यानंतर जमिनीवर कोसळलेल्या तरुणाची अवस्था बघुन ‘गोट्याची विकेट पडली, पळ…’ असे म्हणत फरार झालेल्या दोघांना पहाटे २.३० वाजता अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झाला तेव्हा हे दोनही आरोपी नशेत असावेत अशी माहिती समोर आली आहे.

शहरातील बौद्धनगर येथे राहणारे आणि व्यवसायाने मजूर असलेले प्रज्वल उर्फ गोट्या संजय मस्के (वय २१) हा आपला चुलत भाऊ आतिश बाबासाहेब मस्के (वय २३) याच्या सोबत रात्री ११ वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ातील लाइफ लाईन हॉस्पिटलसमोर थांबला होता. यावेळी आंबेडकर चौक – परिसरात ओळखीचे गणेश सुरेश गायकवाड आणि भिमा सूर्यवंशी हे दोघेही तिथे आले. त्यातील गणेश गायकवाड याने मोठ्याने आवाज देत प्रज्वल मस्के याला बोलावून घेतले. प्रज्वल मस्के त्यांच्याकडे जाताच त्यांच्यात जुना बाद उफाळून आला. वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले आणि लगेचच शिवीगाळ सुरू झाली. ‘तू मला लई दिवसांपासून डोक्यात बसलास, आज तुझा कायमचा बंदोबस्त करतो,’ अशी धमकी देत गणेश गायकवाड याने आपल्या कमरेला असलेला धारदार चाकू काढून प्रज्वल मस्के याच्यावर वार केला.

Maharashtra TimesBeed Crime: मैत्रीचा धक्कादायक शेवट! रायमोहा परिसरातील खुनाचा 12 तासांत छडा, आरोपीला अटक; कारण आलं समोर…

चुलत भावाने सगळं सांगितलं

दरम्यान, भिमा सूर्यवंशी याने आतिश मस्केला धक्का देत बाजूला ढकलले आणि त्यालाही जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला, मात्र त्यांनी कशीबशी सुटका करुन पळ काढला. आरोपींनी प्रज्वल मस्के याच्यावर पोटात व छातीवर वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, त्याला तत्काळ शासकीय दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आतिश मस्के याच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलिसांत गणेश सुरेश गायकवाड आणि भिमा सूर्यवंशी (दोघे रा. आनंद नगर, लातूर) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

खुनाचे प्लॅनिंग झाले कसे?

“आज एकाचा बर्थडे आहे असे आरोपीने दुपारीच मित्रांना सांगितले होते. आम्ही रात्री बॅनर तयार करण्यासाठी आंबेडकर चौकात आलो होतो. तेथे आमच्याच परिसरातील विकास गायकवाड याला कोणीतरी मारहाण केल्यामुळे त्याला चौकातील लाइफ लाईन हॉस्पिटलमध्ये नेल्याचे समजले, म्हणून तिथे थांबलो. त्याच वेळी बाजुच्या पान टपरीच्या मागे दोन्ही आरोपी थांबले होते. त्यांनी गोट्याला बोलावून घेतले. तो एकटाच तिकडे गेला आणि त्यांची बाचाबाची झाली. जोरजोरात आवाज येत असल्यामुळे आम्ही तेथे पोचलो तर एकाच्या हातात कोयता आणि दुसऱ्याच्या हातात सुरा होता. आरोपी गोट्याच्या पोटात आणि छातीत सुरा खुपसत होते. गोट्या खाली पडल्यावर ‘गोट्याची विकेट पडली पळ आता….’ असे आरोपी एकमेकांना बोलले आणि तेथून पळून गेले. त्याच्या छातीतच चाकू लागला असेल म्हणून मी छातीला दाबून धरलो परंतु नंतर कळाले की त्याच्या पोटातूनही रक्त येत होते. गोट्या आधी राजकारणात पदाधिकारी होता. त्याचाही राग आरोपींच्या मनात होता म्हणूनही कदाचीत त्याला मारले असावे”, असे त्याच्या भावाने सांगितले आहे.

अमित देशमुखांनी गाडी थांबवली

“जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने महापूर येथील प्रचार सभा आटपून बाभळगावकडे परतत होते. रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जात असताना, त्यांना एका तरुणावर चाकूने हल्ला होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गाडी थांबवताच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रज्वलला पाहून त्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि डॉक्टरांशी बोलून तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, पोलीस यंत्रणेला घटनास्थळी पाचारण केले. “अशी माहिती अण्णाराव खोडेवाड, सहायक पोलीस निरिक्षक तथा तपास अधीकारी, लातूर यांनी दिली आहे.

काँग्रेसकडून पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन दिले निवेदन

लातूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने सीमा ओलांडली असून, सामान्य नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संदर्भातील निवेदन लातुर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा