Headlines

गोरेपणाचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री, FDA ची धडक कारवाई – fda raid at nanded manyar galli pakistani beauty products seizes worth 60 lakhs


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धुरा आपल्या हाती घेतल्यापासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोर, बनावट औषध विक्रेते आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात धाडसत्र सुरू आहे. विविध दुकानांवर धाडी टाकण्यात येत असताना आता एफडीएने थेट मोठ्या कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम आईस्क्रीम पार्लरवर कारवाई केली गेली आहे. जिवंत उंदीर आणि माश्या आढळून आल्यानंतर या आईस्क्रीम पार्लरचा परवाना रद्द करण्यात आला. मुंबईतील दहिसर परिसरात दूध भेसळीविरोधात धडक कारवाई करून एकाला अटक करण्यात आली आहे. तसंच दहिसर पोलिस स्टेशन येथे एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ४७० लीटर दूध नष्ट करण्यात आलं आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. फुलंब्री येथील सिद्धेश्वर दूध डेअरीवर कारवाई केली. दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम सुरु असताना आता मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने आपला मोर्चा आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकणाऱ्या बनावट आणि प्रतिबंधित सौंदर्य प्रसाधनांकडे वळवला आहे. नुकतीच नांदेडमध्ये झालेली ५० ते ६० लाखांची मोठी कारवाई आणि यापूर्वी मुंबईत झालेली कारवाई हे स्पष्ट करते की, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एकाही रॅकेटची आता सुटका नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेडमध्ये झालेली कारवाईसोबतच सौंदर्यप्रसाधनाच्या गोऱ्या धंद्यांची काळी बाजू समजून घेऊया..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत