![]()
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर अत्यंत कडक शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज्यातील खालावलेली कायदा व सुव्यवस्था, पोलि
.
राज्यातील गुन्हेगारी आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जयंत पाटील यांनी थेट गृहखात्यावर आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या कारभारावर बोट ठेवले. “या अधिवेशनात आपण काय पाहिले? मंत्री सभागृहात बसत नाहीत, अधिकारी उपस्थित राहत नाहीत. कुणाला काही देणेघेणे नाही असा सगळा अनागोंदी कारभार सुरू आहे. एक नगरसेवक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कसे मारहाण करतो, हेही आपण पाहिले,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
महाराष्ट्र आता बिहार झालाय का?
“गृहखाते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखली जाईल असे वाटले होते. मात्र, माझ्याच मतदारसंघात एकाला गोळी घालून ठार मारण्यात आले, आणि पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. कोणत्या आमदाराने पोलिसांवर दबाव आणून गुन्हा दाखल करण्यापासून रोखले, त्याचे कॉल रेकॉर्ड तपासा. महाराष्ट्र आता बिहार झालाय का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
पोलिसांची हप्तेखोरी; तडजोड करून बुकींना सोडतात
पोलिसांच्या कारभारावर आणि भ्रष्टाचारावर जयंत पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. “ठाण्यातील जमील शेख हत्याकांडात विशेष तपास अधिकारी नेमणार असल्याचे सांगितले होते, त्याचे काय झाले? नागपूरबद्दल काही बोलले की परत म्हणाल की नागपूरची बदनामी करतोय. पण नागपूरमध्ये ५०० रुपयांसाठी ९ पोलिसांवर निलंबनाची कारवाई होते, पण तिथेच कोट्यवधी रुपयांची तडजोड करून पोलीस बड्या बुकींना सहज सोडून देतात. सध्या सगळीकडे हप्तेखोरी राजरोसपणे सुरू असून, लोकांचा पोलिसांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. पोलीस स्टेशनमध्ये टेबलावर ‘तीन पत्ती’ खेळतानाचे फोटो मी स्वतः पाठवले आहेत” असे ते म्हणाले.
शंभूराज देसाईंना खुर्चीसाठी खाली मान घालून बसावे लागते
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी घडलेल्या घटनेचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांनाही चिमटा काढला. “साताऱ्यात काय झाले हे सर्वांना माहीत आहे. शंभूराज देसाई यांना स्वतः पोलिसांनी उचलून बाजूला केले. त्यांच्या हाताला दुखापत झाली तेव्हा ते हात वर करून सांगत होते. पण आता वरून ‘दम’ दिल्यामुळे त्यांचा आवाज कमी झाला आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी त्यांना खाली मान घालून बसावे लागत आहे,” असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
हे ही वाचा…
‘भाडे की टट्टू’ ऐवजी आता ‘भाटक गदर्भ’:विधानसभेतील भाषणावरून झालेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर
विधानसभेतील भाषणानंतर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिसिंग लिंकवरील पुलाबाबत पसरवलेल्या खोट्या माहितीवर संताप व्यक्त करत, त्यांनी आधी वापरलेल्या ‘भाडे की टट्टू’ या शब्दाचा संदर्भ स्पष्ट करत ‘भाटक गदर्भ’ आणि ‘सुपारीबाज’ असे शब्द वापरले. तसेच, राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना ‘मिमिक्री आर्टिस्ट’ म्हणत टोला लगावला आणि “ते स्टँडअप कॉमेडियन असते तर इतरांना मार्केट राहिले नसते,” अशी कोपरखळी मारली. सविस्तर वाचा…
