Cm Devendra Fadanvis Reply Raj Thackeray : मिसिंग लिंक प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील शाब्दिक संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. हिंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी विधानसभेत ‘मिमिक्री आर्टिस्ट’ म्हणत राज ठाकरेंवर मिश्कील टिप्पणी केली. या भाषणात त्यांनी आणखी काय म्हटलं, जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मिसिंग लिंक प्रकल्पावरील दरड दुर्घटनेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. आता फडणवीसांनीही त्याला सभागृहातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मिसिंग लिंक प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “कनेक्टिंग लिंकबाबत ७ हजार कोटी रुपये पाण्यात गेले, असा खोटा प्रचार केला जात आहे. हा माझा नाही, तर महाराष्ट्राचा अपमान आहे. खोट्या बातम्या पसरवून राज्याची बदनामी केली जात आहे.”
याच भाषणामध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. “‘भाडे के टट्टू’ या शब्दावर काहींना आक्षेप होता. मग मी अभ्यास केला. सुसंस्कृत भाषेत त्याला ‘भाटक गदर्भ’ म्हणतात. तरीही समजलं नसेल तर ‘सुपारीबाज’ म्हणतात” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी “मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, मग हिंदीत का बोलतात?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “मी एक वाक्य हिंदीत बोललो. ज्यांना ते समजायला हवं होतं, त्यांच्यासाठीच बोललो. पण दुसऱ्यांनाच मिरची लागली. आमचे मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले, हिंदीत का बोललात?” यानंतर त्यांनी मिश्कील शैलीत आणखी एक टोला लगावला. “राज ठाकरे आमचे मित्र आहेत. राजकारणात त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही. पण त्यांनी जर मिमिक्रीच्या क्षेत्रात करिअर केलं असतं, तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट उरलं नसतं,” असं म्हणत त्यांनी सभागृहात राज ठाकरेंची खिल्ली उडवली.
मिसिंग लिंकवरुन प्रकरण तापणार
दरम्यान, मिसिंग लिंक प्रकरणावरून सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सभागृहापासून सोशल मीडियापर्यंत या मुद्द्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील या नव्या शाब्दिक चकमकीमुळे मिसिंग लिंकचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा