Headlines

खायची गोष्ट नाही! वैभव सूर्यवंशीचं शतक 19 धावांनी हुकलं, पण पोराने रचला वर्ल्ड रेकॉर्ड


Vaibhav Sooryavanshi Record : भारत आणि झम्बाब्वेमधील तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने धुलाई केली. आज थोडा अंदाज वेगळा होता आणि शतकाच्या जवळ पोहोचलाच होता पण मोठा फटका मारण्याच्या नादात फसला. वैभवचं शतक हुकलं असलं तरी त्याने वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केलीय.

Vaibhav Sooryavanshi Record
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आज तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १९२-५ धावा दिल्या होत्या. यामध्ये आज बेबी बॉस वैभव सूर्यवंशी याने ८१ धावांची दमदार खेळी केली. नेहमी दांडपट्टा घेऊन मैदानात उतरणाऱ्या वैभवचे आज वेगळे रूप सर्वांनी पाहिले. आज त्याने आक्रमणही सुरू ठेवले होते पण त्यामध्ये कुठेतरी सावधपणा दिसून आला. आज वैभवचे शतक अवघ्या १९ धावांनी हुकले पण त्याने वर्ल्ड रेकॉर्ड रचलाच, नेमका काय आहे तो जाणून घ्या.

वैभव सूर्यवंशी याने आज अर्धशतक करत वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केलाय. वयाच्या १५ व्या वर्षी वैभवने दोन आंतरराष्ट्रीय अर्धशतके केली आहेत. वयाच्या १५ व्या वर्षी आपल्या देशाकडून खेळणारा तो जगातील पहिला खेळाडू असल्यान त्याने केलेली प्रत्येक खेळी आता विक्रम रचत आहे. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक त्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्येही अर्धशतक करत त्याने दोन अर्धशतके पूर्ण केली आहेत.
Maharashtra TimesHardik Pandya CSK Offer : हार्दिक पांड्यासाठी चेन्नईने लावली ताकद! 2 स्टार खेळाडूंसह 10 कोटीही देणार, पण मुंबई अडून बसलीय; एका अटीमुळे पेच
वैभवला आयर्लंडविरूद्धच्या मालिकेत संधी मिळाली नाही. त्यानंतर इंग्लंडविरूद्ध खेळण्याची त्याला संधी होती.परंतु आक्रमक सुरूवातीनंतरही मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. झिम्बाब्वेविरूद्ध वैभवने हात चांगले मोकळे केले. पहिल्या सामन्यात ५० धावा आणि तिसऱ्या सामन्यात ८१ धावा ठोकत त्याने इतिहास रचला आहे. आजच्या सामन्यामध्ये वैभवने अर्धशतकासाठी ३१ चेंडू घेतले. ४९ बॉलमध्ये ८१ धावा करताना त्याने ८ चौकार आणि ४ षटकार मारले.
Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi : बेबी बॉस वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेला झोडलं, पठ्ठ्याचं शतक हुकलं, भारताकडून 193 धावांचे टार्गेट
दरम्यान, वैभव सूर्यवंशी याने आपल्या कामगिरीने संघातील जागा पक्की केली यात काही शंका नाही. कारण त्याच्यासोबत सलामीला येणारा अभिषेक शर्मा हा या मालिकेमध्ये अपयशी ठरला. एकाच गोलंदाजाने त्याला तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये आऊट केले आहे. तीन सामन्यात मिळून त्याने फक्त ११ धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे वैभवने दोन अर्धशतके करून २० धावा केल्या होत्या. दोघेही पॉवर प्लेमध्येच खेळायला येतात. मात्र वैभवने समजूतदारपणे त्याच्याविरूद्धही धावा केल्या आहेत.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा