IND vs ZIM 3rd T20 Match Result : भारताने झिम्बाब्वे संघाला शेवटच्या टी-२० सामन्यातही पराभूत करत मालिका ३-० ने जिंकली. आज वैभवचा शो पाहिला मिळाला. कॅप्टन झाल्यावर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच मालिका जिंकली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : तिसऱ्या आणि अंतिम सामन्यामध्ये भारताने यजमान झिम्बाब्वे संघाचा ३५ धावांनी पराभव करत मालिका ३-० ने जिंकली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाने प्रथम बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये १९२-५ धावा केल्या होत्या. भारताकडून वैभव सूर्यवंशी याने ८१ धावांची झकास अर्धशतकी खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाव्बेचा संघं १७५-७ धावांपर्यंतच पोहोचू शकला. मयांक यादव याने सर्वाधिक तीन आणि यश ठाकूरने दोन विकेट नावावर केल्या. कर्णधार झाल्यापासून श्रेयस अय्यर याने जिंकलेली ही पहिली मालिका आहे. भारताला आयर्लंड आणि इंग्लंड संघाने व्हाईटवाश दिले होते. त्यामुळेलही मालिका श्रेयससाठी खास असणार आहे. पहिला विजय आणि पहिली मालिका त्याने झिम्ब्वाब्वेविरूद्ध नावावर केली आहे.
भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे सलामीला उतरले होते. आज पुन्हा एकदा अभिषेक हा अपयशी ठरला. त्याला या मालिकेत ब्लेसिंग मुझाराबानीने तीनदा आऊट केले. अभिषेक शर्मा २ धावा करून आऊट झाला. वैभवने आज संयमीपणे खेळी करताना ईशान किशनसोबत ५० चेंडूत ७५ तर अय्यरसोबत ५० धावांची भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने पोहोचवले होते.आज बॅटिंगमध्ये वैभवने सर्वाधिक ८१ धावा केल्या. ईशान किशन २९ धावा, श्रेयस अय्यर २७ धावा आणि रिंकू सिंग २५ धावा केल्या होत्या. ब्रॅड इव्हान्सने सर्वाधिक दोन विकेट नावावर केल्या. Vaibhav Sooryavanshi : खायची गोष्ट नाही! वैभव सूर्यवंशीचं शतक 19 धावांनी हुकलं, तरी पठ्ठ्याने रचला वर्ल्ड रेकॉर्ड झिम्बाब्वे संघ बॅटिंगला उतरल्यावर ब्रायन बेनेटला पहिल्याच बॉलवर मयांकने माघारी पाठवले. बेन कुरान २० धावा केल्या त्याला बिश्नोईने आऊट केले. आज झिम्बाब्वेकडून रायन बर्लने नाबाद राहत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर वेसली मधेवेरेने २८ धावा केल्या. आज यश ठाकूर याला हॅट्रिकची संधी आली होती. त्याने चौथ्या ओव्हरमध्ये चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेतल्या होत्य. मात्र त्याला विकेट घेता आली नाही. आज मयांकने सर्वाधिक तीन आणि यश ठाकूरने दोन विकेट घेतल्या. IND vs ZIM 2nd T20 : झिम्बाब्वेला लोळवलं पण भारताला विजयानंतर एक वाईट बातमी, कॅप्टन अय्यरही टेन्शनमध्ये, नेमकं काय झालं? दरम्यान, आजच्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी हा सामनावीर ठरला. तर मालिकावीर म्हणूनही वैभव सूर्यवंशी याला गौरवण्यात आले. वैभवने या मालिकेत सर्वाधिक १५१ धावा केल्या. यामध्ये त्याने १५ चौकार आणि ९ षटकार मारले.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा