Kushal Badrike : कुशल बद्रिके ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये झळकणार असून अभिनेत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘ चला हवा येऊ द्या ‘ हा झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम असून या कार्यक्रमानं अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या कार्यक्रमानं अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. त्यापैकी एक म्हणजेच कुशल बद्रिके. कुशल बद्रिकेनं ‘चला हवा येऊ द्या’ मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर अभिनेता ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या पर्वातही झळकला होता. अशातच आता अभिनेता ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ या लोकप्रिय कार्यक्रमातही झळकणार आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीनं हास्यजत्रेचा प्रोमो शेअर केला आहे.
गौरव सोबत बोलू नका, त्याची कामं थांबवा, मोठा खुलासा
सोनी मराठीनं शेअर केलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये अरुण कदम, प्रियदर्शिनी इंदलकर आणि श्रमेश बेटकर यांच्यामध्ये विनोदाची जुगलबंदी होत असतानाच स्टायलिश कुशल बद्रिकेची एन्ट्री होते. कुशल बद्रिके आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यामध्ये संवाद होतो. त्यानंतर पुढे कुशल आणि दत्तू मोरेही विनोदाचं अचूक टायमिंग साधताना दिसतात. त्यामुळे कुशलला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ सिनेमाबद्दल
कुशल बद्रिके त्याच्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या सिनेमाच्या निमित्तानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये सहभागी होणार आहे. कुशल सोबतच सिनेमाचे दिग्दर्शक आणि इतर कलाकारही सहभागी झाले आहेत. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ सिनेमात कुशल बद्रिकेसोबत संतोष जुवेकर, अंकुश चौधरी, अभिजित चव्हाण यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तसेच महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले या अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विजू माने यांनी केलं असून हा सिनेमा ३१ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. Maria Susairaj : अभिनेत्रीवर संशय, बॉयफ्रेंडनं कास्टिंग डायरेक्टरला संपवलं, बॉडीसमोरच दोघांनी ठेवले संबंध; इंडस्ट्रीतील चक्रावून टाकणारी घटना दरम्यान, कुशल बद्रिकेच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं ‘पांडू’, ‘जत्रा’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर अभिनेता ‘मॅडनेस माचयेंगे’ या हिंदी कार्यक्रमातही झळकला आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा