खरात प्रकरणातील महिलांवरही कारवाई? आशा मिरगे थेटच बोलल्या, चाकणकरांचं आर्थिक कनेक्शन सांगितलं – aasha mirge demands registration of case against rupali chakankar in ashok kharat case
खरात प्रकरणातील महिलांवरही कारवाई? आशा मिरगे थेटच बोलल्या, चाकणकरांचं आर्थिक कनेक्शन सांगितलं – aasha mirge demands registration of case against rupali chakankar in ashok kharat case
अशोक खरात प्रकरणातील संबंधित महिलांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. यावर महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. याउलट महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरगेंनी केली. मागील काही काळात चाकणकरांच्या संपत्तीत ७० पट्टीने वाढ झाल्याचे म्हणत त्यांचे आणि खरातचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही मिरगेंनी केला.