Headlines

कोकणवासियांसाठी आणखी एक विमानतळ, रत्नागिरी येथून प्रवासी विमानसेवा सुरू होणार; मंत्री उदय सामंत यांनी दिली अपडेट


Ratnagiri Airport Passenger Flights: सध्या रत्नागिरी विमानतळावरून सामान्य नागरिकांसाठी विमानेवा उपलब्ध नाही पण सेवा सुरू करण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. लवकरच ‘एअर अलायन्स’ सोबत करार करण्यात येणार आहे.

रत्नागिरी विमानतळ
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणवासियांना लवकरच हवाई प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी येथील विमानतळ आता लवकरच सुरू होणार आहे. विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं असून लवकरच रत्नागिरीकरांचं विमान प्रवासाचे स्वप्न साकारणार आहे.

उडान योजनेअंतर्गत विकास

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी ‘एअर अलायन्स’ या नामांकित विमान कंपनीची निवड अंतिम करण्यात आली असून लवकरच विमानतळ पूर्णपणे ताब्यात घेऊन अधिकृत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येईल. यासाठी येत्या ८ ते १० दिवसांत केंद्रीय संरक्षण खात्यासोबत सामंजस्य करार (MOU) केला जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Maharashtra TimesPune International Airport: पुनर्बांधणीच्या कामांदरम्यान पुणे विमानतळ सुरू राहणार, जुनं टर्मिनलही लवकरच खुलं करणार; प्रवाशांना मोठा फायदा होणार

या पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एअर अलायन्स’ ने निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे या मार्गावर विमान कंपनी निवडण्याचा प्रश्न मिटला आहे. प्रशासकीय प्रक्रियेतील सर्व प्रलंबित प्रस्तावांना तातडीने मंजुरी दिली जात आहे. विमान प्राधिकरणाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक (एमडी) दीपक कपूर येत्या ८ ते १५ दिवसांत रत्नागिरी विमानतळ टर्मिनलला भेट देऊन अंतिम पाहणी करणार आहेत. “काल मी विमानतळाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि आपण रत्नागिरीत नसून कुठल्यातरी मोठ्या आधुनिक शहरात आहोत असा सुखद अनुभव मला आला. विमानतळाची नवनिर्मित मुख्य इमारत ही संपूर्णपणे पर्यावरणपूरक अशा ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेवर आधारित आहे. विमान वाहतुकीसाठी आवश्यक असणारी सर्व अत्याधुनिक तांत्रिक उपकरणे, रडार यंत्रणा आणि दळणवळणाची साधने या ठिकाणी आधीच दाखल झाली असून त्यांची उभारणी पूर्ण झाली आहे,” असे मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांना विमानतळ पाहण्याची संधी

विमानतळ कार्यान्वित होण्यापूर्वी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना विमानतळाला भेट देण्याची सुवर्णसंधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले. जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर सामंत यांनी विमानतळ टर्मिनलच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

Maharashtra TimesMaharashtra Weather: मान्सून कोकणातच रेंगाळला, मुंबई-पुण्यात पूर्वमोसमी पाऊसही बेपत्ता; लवकरच विदर्भ, मराठवाड्यासह राज्याला दिलासा मिळणार

विमानतळ व्यावसायिकदृष्ट्‌या पूर्णपणे सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा नियमांमुळे सर्वसामान्य नागरिक किंवा विद्यार्थ्यांना धावपट्टी व मुख्य तांत्रिक विभागात प्रवेश मिळणे अशक्य होईल. हीच बाब लक्षात घेऊन, विमानतळ सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना या संपूर्ण वास्तूची प्रत्यक्ष पाहण्याची संधी दिली जाणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी विमानतळावरील धावपट्टी कशी असते, तिथे कोणत्या प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं आणि विमानांचे संचलन व सुरक्षा व्यवस्ता कशी कार्य करते या सर्व गोष्टींचा हे प्रत्यक्ष अनुभव घेणं शक्य होणार आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा