जिथं नाग तिथं गारुडी आलाच. सोशल मीडियावर आपल्याला काही अदृश्य गारुडीही जाणवतात. पुंगी कुठून वाजते आहे हे जरा अभ्यास वाढवला तर बरोब्बर कळतं. कुठल्या टोपलीतून कुठल्या विचारांचे नागोदादा आणि नागीणवहिनी बाहेर पडतील हेही जरा निरीक्षणानं कळू लागतं.
नागपंचमी विशेष आर्टिकल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
आज नागपंचमी. नागांचा दिवस. एरवी सदैव फणा काढून असलेल्या या सर्पराजाची अलीकडं आम्हाला कीव येऊ लागली आहे. फूत्कार टाकणे, दंश करणे, विष सोडणे, अचानक वळवळत एंट्री घेणे, कात टाकणे आदी प्रकार ही एके काळी फक्त नागराजांची मिजास होती. आता या गोष्टी कुणीही करतं. सोशल मीडियावरच्या कुठल्याही फलाटावर गेलं, तरी नागोरावांचे भाऊबंद सगळीकडं दिसतात. जिथं नाग तिथं गारुडी आलाच. सोशल मीडियावर आपल्याला काही अदृश्य गारुडीही जाणवतात. पुंगी कुठून वाजते आहे हे जरा अभ्यास वाढवला तर बरोब्बर कळतं. कुठल्या टोपलीतून कुठल्या विचारांचे नागोदादा आणि नागीणवहिनी बाहेर पडतील हेही जरा निरीक्षणानं कळू लागतं. या जगातल्या यच्चयावत ‘इझम’च्या टोपल्या या गारुडी मंडळींनी सर्वच फलाटांवर पसरून ठेवल्या आहेत. आपल्याला तिथं चालताना भयंकर काळजी घ्यावी लागते. कधी कुठल्या टोपलीवर पाय पडेल आणि नागीणताई बाहेर पडून कडकडून दंश करतील, हे सांगता येत नाही. खरा नाग किंवा नागीण यांना दुर्दैवानं आवाज काढता येत नाही. ‘हिस्स, हुस्स, फुस्स’ यापलीकडं बिचाऱ्यांना कुठलाही ‘आवाज’ नाही. सोशल मीडियावरच्या नाग-नागिणींना आवाजही काढता येतो. तो आक्रस्ताळा आवाज ऐकला, की यापेक्षा हळूच विषाचं इंजेक्शन टोचलेलं बरं, असं वाटायला लागतं. खरा नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असतो असं म्हणतात. हे आभासी फूत्कार टाकणारे लोक घरच्यांचेही मित्र नसतात, तर बाकी कुणाचा प्रश्नच येत नाही. या नागमंडलाच्या सान्निध्यात फार काळ राहिलं की बघता बघता आपलंही एका सरपटणाऱ्या प्राण्यात कधी रूपांतर होतं हे कळत नाही. खरा नाग विनाकारण कधीही दंश करत नाही. आपण मात्र उगाच फूत्कार टाकायला शिकतो. हळूहळू आपल्यासह सगळ्याच डीपीवर ‘दहा’चा आकडा दिसू लागतो. तो डीपी बदलण्याचा आजचाच दिवस. ती कात टाकण्यासाठी आजच्यासारखा मुहूर्त नाही. त्यासाठी नागपंचमीच्या शुभेच्छा!
– चकोर
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा