Headlines

सगुण-निर्गुण : सत्कर्म हवे… – maharashtra times sagun nirgun good deeds wanted article


तर रोजचा दिवस हा स्वतःचीच नजर स्वतःवर ठेवण्याचा आहे, असं तुकाराम महाराज सांगतात. याचं कारण त्यांना माणूस कसा आहे, ते माहीत आहे. स्वतःमध्ये डोकावून पाहिलं, तर स्वार्थलिप्तताच दिसते.

Maharashtra Times Sagun Nirgun Good deeds wanted article
महाराष्ट्र टाइम्स सगुण निर्गुण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
अनिरुद्ध शांडिल्य

वाची भक्ती करायची, तर मनावर अंकुश हवा, मन सावध हवं, ते बहकणार नाही याची काळजी घ्यायला हवी, ते विषयानंदातच बुडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. हे करायचं, तर रोजचा दिवस हा स्वतःचीच नजर स्वतःवर ठेवण्याचा आहे, असं तुकाराम महाराज सांगतात. याचं कारण त्यांना माणूस कसा आहे, ते माहीत आहे. स्वतःमध्ये डोकावून पाहिलं, तर स्वार्थलिप्तताच दिसते. मी आणि माझं याशिवाय विचार मनात येत नाही. मी मोठा, हा भाव लोप पावत नाही. हे माझं आहे, पण त्याच्याजवळ असलेलंही कसं मिळवता येईल, याची गणितं संपत नाहीत. आज मिळतंय त्याहून जास्त कसं पदरात पडेल, हा विचार पाठ सोडत नाही. चमचमीत खाण्याची, विषयभोगाची भूक जागीच असते. डोक्यातलं ‘पैसा एके पैसा’ कधी थांबत नाही. सामान्यांची अशी अवस्था असतेच, पण मोठे म्हटले जाणारेही वेगळे नसतात. एक प्रवचनकार आहेत. त्यांच्याकडं देखण्या रूपाबरोबर ओघवती वाणी आहे. तास-दीडतास बोलण्याइतकं वाचन आहे. व्यासपीठावर बसले की संतांचं जीवन रसाळपणं मांडतात. त्यात ते धनाबाबतची उदासवृत्ती, निःस्वार्थ बुद्धी, साधी राहणी, निरहंकारी स्वभाव याची बहारदार वर्णनं करतात. मोठमोठी वचनं सांगतात. थोरांचे हवाले देतात. चकित करणाऱ्या अनुभवांची गाठोडी उलगडतात. ब्रह्मतेजाइतकंच त्यांना क्षात्रतेजाचंही आकर्षण आहे. त्याच्याही गाथा ते सांगतात. यात्रा कंपन्यांना अशी माणसं हवी असतात. आर्थिक फायद्यावर नजर असलेल्या या कंपन्या अशा प्रवचनकारांना आपल्याबरोबर नेतात. त्यामुळं त्यांना प्रवासानंदाबरोबर अर्थानंदही मिळतो. तो अधिक मिळवण्यासाठी, प्रवचन संपताच व्यासपीठावर बसलेले असताना, गळ्यात फुलांचा हार असताना, जवळच ठेवलेल्या देवाच्या तसबिरीजवळची समई तेवत असताना हे प्रवचनकार आपल्या यात्रेची, ती नेणाऱ्या कंपनीची माहिती सांगतात. त्यात सामील होण्याचं आवाहन करतात. जणू क्षणभरापूर्वी भक्तिमार्ग, अध्यात्म यांच्या गोष्टी सांगणारं दुसरंच कोणी होतं! बहुसंख्य जन हे असेच असतात. त्यांना तुकाराम महाराज सांगतात, ‘देहबुद्धि जयां वसे लोभ चित्तीं। आपुलें जाणती परावें जे।। तयासी चालता पाहिजे सिदोरी। दुःख पावे करी असत्य तो।। तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें। छाया इच्छी उन्हें तापला तो।।’

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा