Headlines

कलेसाठी संसाराची राखरांगोळी, कलाकारांच्या आयुष्यातील भीषण वास्तव, खान्देशी इंडस्ट्रीचा भळभळता इतिहास – history of khandeshi industry heartbreaking reality of artists



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाषा, संस्कृती, संगीत, कला हे सर्व जिवंत राहावं म्हणून काही लोकांनी आपल्या संसाराच्या राखरांगोळ्या केल्या आहेत. या माणसांनी जे जपलं आहे, त्यांचा इतिहास आपल्या सर्वांसमोर यावा, ही माणसं लोकांसमोर यावीत, संपूर्ण महाराष्ट्राला ही माणसं कळावीत आणि या माणसांचा आदर्श घेऊन आपली कला, संस्कृती आणखी वाढावी, यासाठी हे प्रामाणिक प्रयत्न आहेत. या कलाकारांचा त्याग खूप मोठा आहे. त्यांनी आपली संपूर्ण हयात दिली, आपल्या कलेसाठी आपली घरेदारे विकली. पण नंतरच्या काळात त्यांना कामे मिळत नव्हती. अनेक जातीवंद कलाकार आजाराने ग्रासले गेले. त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नव्हते. काही लोकं व्यसनाधिन झाले तर काही जणांनी कला क्षेत्र सोडलं. या कलाकारांवर जी अवस्था आली तशीच अवस्था आजच्या यु्ट्यूब फेम कलाकारांवर येऊ नये. कारण काळ थांबत नाही. आज काळ युट्यूबचा किंवा ऑनलाइन माध्यमांचा काळ असला तरी उद्या भविष्यात काय येईल, याचा भरोसा नाही.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत