Headlines

जळगावी दहावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; जुन्या किरकोळ वादातून वर्गमित्राचे गंभीर कृत्य, पालकांमध्ये खळबळ |Maharashtra Times


Jalgaon Crime: हा वार एवढा भीषण होता की हा जखमी विद्यार्थी जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि वेदनेने विव्हळू लागला.

Anderson Phillip Catch - 2026-08-08T121146
जळगाव क्राईम बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील पंधरा वर्षीय मित्रावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. ७) सकाळी आयोध्यानगर भागातील रायसोनी शाळेपासून शंभर मीटर अंतरावर घडली.

कुसुंबा येथील पंधरावर्षीय विद्यार्थी बी. यू. एन. रायसोनी शाळेत दहावीत शिक्षण घेतो. त्याने शाळेच्या मुख्याध्यापकांकडे खासगी क्लास लावलेला आहे. शुक्रवारी सकाळी क्लास संपल्यानंतर हा विद्यार्थी इतर मित्रांसह शाळेच्या दिशेने जात होता. त्याचवेळी, क्लासमधून तासभर आधीच निघालेला त्याचा वर्गमित्र मागून हातात चॉपर घेऊन आला. त्याने अचानक या विद्यार्थ्याच्या बरगडीवर चॉपरने जोरदार वार करीत तो गोल फिरवला.

Maharashtra TimesDevendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईघटनेचे गांभीर्य पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच त्याचे वडील तेथे पोहोचले आणि त्यांनी त्याला पुढील उपचारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Maharashtra TimesNashik Bribe Case: नाशिक महापालिकेचा लाचखोर सहाय्यक अधीक्षक ACBच्या जाळ्यात; घरपट्टीसाठी स्वीकारले 60 हजार, प्रकरण काय?काय होता वाद ?

जखमी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वर्गात संशयित विद्यार्थ्याने त्यांच्या मुलाच्या पायात पाय अडकवून त्याला खाली पाडले होते. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी दोघांच्या पालकांना शाळेत बोलावून समज दिली होती, तसेच संबंधित विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्याचा इशाराही दिला होता. याच रागातून ही भीषण घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

बालविवाहाप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा

जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देऊन तिचा लैंगिक छळ करण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात पतीसह सासू, सासरे आणि आई-वडिलांवर पोक्सो कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर पीडितेने बालकाला जन्म दिला. अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देऊन तिच्यासोबत झालेल्या बाललैंगिक अत्याचारास प्रोत्साहन दिल्याचे तपासात उघड झाल्याने पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा