Jalgaon Crime: हा वार एवढा भीषण होता की हा जखमी विद्यार्थी जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि वेदनेने विव्हळू लागला.

कुसुंबा येथील पंधरावर्षीय विद्यार्थी बी. यू. एन. रायसोनी शाळेत दहावीत शिक्षण घेतो. त्याने शाळेच्या मुख्याध्यापकांकडे खासगी क्लास लावलेला आहे. शुक्रवारी सकाळी क्लास संपल्यानंतर हा विद्यार्थी इतर मित्रांसह शाळेच्या दिशेने जात होता. त्याचवेळी, क्लासमधून तासभर आधीच निघालेला त्याचा वर्गमित्र मागून हातात चॉपर घेऊन आला. त्याने अचानक या विद्यार्थ्याच्या बरगडीवर चॉपरने जोरदार वार करीत तो गोल फिरवला.
Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा कुंभ यंत्रणेला अल्टिमेटम! महिनाभरात प्रगती दाखविण्याचे आदेश, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईघटनेचे गांभीर्य पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच त्याचे वडील तेथे पोहोचले आणि त्यांनी त्याला पुढील उपचारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
Nashik Bribe Case: नाशिक महापालिकेचा लाचखोर सहाय्यक अधीक्षक ACBच्या जाळ्यात; घरपट्टीसाठी स्वीकारले 60 हजार, प्रकरण काय?काय होता वाद ?
जखमी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वर्गात संशयित विद्यार्थ्याने त्यांच्या मुलाच्या पायात पाय अडकवून त्याला खाली पाडले होते. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी दोघांच्या पालकांना शाळेत बोलावून समज दिली होती, तसेच संबंधित विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकण्याचा इशाराही दिला होता. याच रागातून ही भीषण घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
बालविवाहाप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा
जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देऊन तिचा लैंगिक छळ करण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात पतीसह सासू, सासरे आणि आई-वडिलांवर पोक्सो कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर पीडितेने बालकाला जन्म दिला. अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देऊन तिच्यासोबत झालेल्या बाललैंगिक अत्याचारास प्रोत्साहन दिल्याचे तपासात उघड झाल्याने पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

