Ajinkya Rahane Monthly Pension : भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे याने निवृत्ती घेतली आहे. बीसीसीआयकडून माजी खेळाडूंना पेन्शन दिली जाते, अजिंक्यला दरमहिना किती पेन्शन मिळणार जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. ३० जुलैला सोशल मीडियावर सकाळी एक व्हिडीओ शेअर करत अजिंक्यने आपल्या निवृत्तीबाबत माहिती दिली. भारतासाठी खेळताना अजिंक्यने दिलेले समर्पण कोणीही विसरू शकणार नाही. शांत, संयमी आणि अत्यंत विश्वासार्ह तंत्रशुद्ध खेळाडू अशी अजिंक्यची ओळख होती. क्रिकेट खेळताना देशासाठी नेहमी योद्ध्यासारखा तो मैदानात दिसायचा, प्रत्येकाच्या मनात त्याने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पण आता पुढे काय अजिंक्य रहाणे काय करणार? त्याचा प्लॅन काय असणार? अजिंक्यने आपण पुढे क्रिकेटसाठीच योगदान देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. निवृत्त झाल्यावर बीसीसीआय खेळाडूंना पेन्शन दिली जाते. अजिंक्य रहाणेला किती मिळणार यासाठी नेमके काय नियम आणि अटी असणार जाणून घ्या.
अजिंक्य रहाणेला BCCI कडून किती पेन्शन मिळणार?
बीसीसीआयने निवृत्त झालेल्या खेळाडूंसाठीचे २०२२ चे पेन्शन स्लॅब बदलले होते. आता भारताकडून २५ कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूंना ५०,००० रूपये मिळत होते. पण जेव्हा सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष असताना ही रक्कम ७५,००० हजार करण्यात आलेली. अजिंक्य रहाणेने भारताकडून ८५ कसोटी सामने खेळले असल्याने त्याला दर महिन्याला ७५००० रूपये पेन्शन मिळेल. पंचही क्रिकेटचे अनसंग हिरो असून बीसीसीआय त्यांच्या योगदानाला महत्त्व देत असल्याचं सौरव गागुलीने म्हटलं होतं.
Ajinkya Rahane : आणखी काय हवं! माझा सर्वात लाडका पार्टनर, अजिंक्य रहाणेला निवृत्तीनंतर दिग्गजांच्या आभाळभर शुभेच्छा, यशाचा गाजावाजा न करणारा क्रिकेटपटू बीसीसीआयने निवृत्त क्रिकेटपटू आणि पंचांसाठी वेगवेगळे पेन्शन स्लॅब ठरवले आहेत. यानुसार 25 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूंना दरमहा ७०,०००, तर १० ते २४ कसोटी खेळलेल्या खेळाडूंना ६०,००० पेन्शन मिळते. महिला आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ५२,५०० आणि महिला फर्स्ट-क्लास/देशांतर्गत खेळाडूंना ४५,००० दिले जातात. पुरुष फर्स्ट-क्लास खेळाडूंना त्यांच्या सामन्यांच्या संख्येनुसार ३०,००० ते ४५,००० पर्यंत पेन्शन मिळते. तसेच सुधारित स्लॅबनुसार माजी पंचांना दरमहा ४५,००० पर्यंत पेन्शन दिली जाते.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा