Headlines

हरवलेले-चोरीस गेलेले मोबाईल संबंधितांना परत


त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून अथणी पोलिसांनी 57 हरवलेले व चोरलेले मोबाईल ताब्यात घेऊन ते संबंधितांना परत करण्यात आले आहेत. शुक्रवारी अथणी येथे हा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत चोरीस गेलेल्या व हरवलेल्या मोबाईल्सचा टप्प्याटप्प्याने शोध घेतला आहे. शुक्रवारी 57 मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत