Headlines

सलग तिसऱ्या दिवशी विधिमंडळ अंदाज समितीच्या रडारवर मनपा:सीना नदी, कचरा संकलनासह मनपा प्रशासनाच्या कामकजावर नाराजी‎



महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीच्या रडावर सलग तिसऱ्या दिवशीही महापालिका प्रशासन राहिले. शनिवारी झालेल्या समितीच्या शेवटच्या बैठकीत सीना नदीचे खोलीकरण, कचरा डेपो व सीना नदीवरील उद्यान विकासाचा प्रकल्पावर या समितीने लक्ष केंद्रीत करुन मनपा प्रशासनाची

.

६ ते ८ ऑगस्टदरम्यान जिल्हा दौऱ्यावर आलेल्या या समितीने शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात पहिला विषय मनपा संबंधितच समोर आला.

विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर शनाखाली हा दौरा झाला. समितीत काशिराम पावरा, कृष्णा खोपडे, बालाजी कल्याणकर, शेखर निकम, डॉ. राहुल पाटील, कैलास पाटील, सदाशिव खोत, हेमंत पाटील, सतीश चव्हाण, मंदा म्हात्रे, मनिषा चौधरी व नमिता मुंदडा यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मनपा आयुक्त यशवंत डांगे आणि विधानमंडळ सचिवालयाच्या अवर सचिव सीमा तांबे यांची उपस्थिती होती.

दरम्यान, पायाभूत सुविधा, कृषी पर्यटन, जलसंधारण तसेच शेतकरी योजनांच्या अंमलबजाव णीबाबतही समितीने प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

दौऱ्यादरम्यान जमा केलेली कागदपत्रे, प्रत्यक्ष पाहणीत आढळलेल्या त्रुटी आणि अधिकाऱ्यांकडून घेतलेली माहिती यावर समिती सखोल मंथन करते. अहवाल तयार करणे, दौऱ्यात निदर्शनास आलेल्या गोष्टी, प्रशासकीय कामांमधील कसूर, वित्तीय व विकासकामांची स्थिती आणि सुधारणांसाठीच्या शिफारशी यांचा समावेश असलेला एक सविस्तर शिफारस अहवाल तयार केला जातो. हा अंतिम अहवाल महाराष्ट्र विधानमंडळाच्या सभागृहात मांडला जातो.अहवालातील निरीक्षणे व ताशेरे संबंधित शासकीय विभाग, जिल्हा प्रशासन आणि महापालिकेला पाठवले जातात. अहवालात ज्या त्रुटींवर आक्षेप घेतला आहे, त्यावर ठराविक मुदतीत स्पष्टीकरण किंवा ‘अॅक्शन टेकन रिपोर्ट’ सादर करावा लागतो.जर प्रशासनाकडून योग्य उत्तर किंवा सुधारणा मिळाली नाही, तर समिती संबंधित अधिकारी किंवा दोषींवर हक्कभंग किंवा कठोर प्रशासकीय कारवाईची शिफारस करू शकते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत