Headlines

समृद्धी महामार्गावर मेंढ्यांच्या कळपासह गायींचा वावर:अपघाताचा धोका वाढला, टोलवसुली चोख, कॅमेरे-गस्तीचे दावे, प्रवाशांच्या जिवाशी खेळ‎



टोल वसुलीत काटेकोरपणा, वेगावर नजर ठेवणारी यंत्रणा, ठिकठिकाणी कॅमेरे अन् गस्तीचे दावे; पण प्रवाशांच्या जीवाशी थेट संबंध असलेल्या सुरक्षेचे काय? ताशी १२० किलोमीटर वेगाने वाहने सुसाट धावणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या वैजापूर-छत्रपती संभाजीनगर पट्ट्यात में

.

हा प्रकार एखाद्या दिवसापुरता मर्यादित नसून पावसाळ्यात महामार्गालगत हिरवळ वाढल्यापासून वारंवार दिसत असल्याचे चित्र आहे. काही पशुपालक जनावरे चरण्यासाठी या भागात आणत असल्याने धोका वाढला आहे. मुख्य मार्गिकेलगत लोखंडी गार्डरेल, त्यापलीकडे संरक्षित पट्टा आणि बाहेरील बाजूस सिमेंटचे कुंपण असतानाही एवढा मोठा कळप आत पोहोचतोच कसा, हा प्रश्न आहे. काही मेंढ्या तर गार्डरेलखालून डोके काढून रस्त्याच्या अगदी कडेपर्यंत आल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. जनावरांची ही ‘एन्ट्री’ गस्त आणि देखरेखीच्या नजरेतून वारंवार कशी सुटते? एखादा कळप क उधळून मुख्य मार्गिकेत घुसला, तर चालकाला सावरण्यासाठी काही सेकंदही मिळणार नसल्याची स्थिती आहे. फोटो टिपण्यासाठी जागेवर पोहोचलो अन् समोरचे दृश्य पाहून क्षणभर धडकीच भरली. गार्डरेलला खेटून मेंढ्यांचा कळप, काही अंतरावर गाय आणि अगदी बाजूने सुसाट धावणारी वाहने. कॅमेऱ्याची प्रत्येक फ्रेम टिपताना एकच प्रश्न पडत होता, एखादे जनावर अचानक रस्त्यावर आले तर वाहनचालकाला सावरण्यासाठी वेळ तरी किती मिळणार? असा प्रश्न आहे. या गंभीर प्रकाराबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच समृद्धी महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी अनेकवेळा दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी फोन स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. महामार्गाच्या बाह्य हद्दीला सिमेंट पॅनलची भिंत उभारण्यात आली आहे. तरीही आतील भागात पशुधन पोहोचत असल्याने संपूर्ण पट्ट्याची तपासणी आवश्यक ठरते. कुठे पॅनल तुटले आहे, कुठे मोकळी जागा आहे जोडरस्त्याजवळून प्रवेश मिळतो आहे का, याचा शोध घेऊन जागांची नोंद करणे महत्त्वाचे आहे. ११ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत समृद्धी महामार्गावर ४९१ अपघातांत ४४४ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. अपघातांमागील चालकांच्या चुकांसोबत रस्त्यालगतचे संभाव्य धोके, वन्यप्राण्यांचा प्रवेश आणि प्रतिबंधात्मक उपायांचाही स्वतंत्रपणे आढावा घेण्याची गरज आहे. हडसपिंपळगाव शिवारातील चॅनल क्रमांक ४७१ जवळ ३० जुलैच्या रात्री अचानक रानडुक्कर समोर आल्याने काही क्षणांच्या अंतराने दोन वाहने अपघातग्रस्त झाली. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले; सुदैवाने प्रवासी बचावले. वन्यप्राण्यांचा प्रवेश केवळ शक्यता नसून प्रत्यक्ष अपघाताचे कारण ठरत असल्याचे चित्र आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत