Headlines

सगुण-निर्गुण: उपदेश नव्हे, समुपदेश! – manisha ravrane sagun nirgun article on advice and counseling


-प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

ज्या वाटेत पुष्कळ डोंगर, किल्ले वगैरे आहेत असे समजून, किंवा पक्षी आपापल्या घरट्यांकडे परत जात आहेत तेव्हा संध्याकाळ झाली असे समजून जो आपल्याजवळ काहीएक ऐवज न घेता सडा जातो, त्यास चोर कसे लुटतील?’ किती मार्मिक दाखला माउलींनी दिला आहे तेराव्या अध्यायात. काय सांगण्यासाठी? ज्ञानी माणसाच्या विचार, दृष्टीविषयी. पुढे वय होईल हे जाणून तो आधीच तयारी करून ठेवतो, त्यामुळे अशा ज्ञानी व्यक्तीला वार्धक्याचा (चोरांचा) त्रास होत नाही.

तैसें वृद्धाप्य होय। आलेपण वाया जाय।

जे तो शतवृद्ध (शतायुषी) आहे। नेणों कैंचा॥

हा माणूस इतर अज्ञानी लोकांप्रमाणे ‘शंभर वर्षं आयुष्य आहे’ असे समजत नाही. म्हणून त्याला म्हातारपण आले असता, म्हातारपणच उलट परत जाते. त्यासाठी तो काय करतो? कान बधिर झाले नाहीत तोपर्यंत (आत्मज्ञानाच्या) सर्व गोष्टी ऐकून घेतो. शरीर स्वाधीन आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घेतो. दृष्टी, वाणी यांचाही उपयोग ईशस्मरणासाठी करतो.

आयुष्याच्या अखेरपर्यंत केवळ देहामध्ये गुंतून राहतो. अशा माणसाला वृद्धावस्था आली की मग तो हादरून जातो. हे टाळण्यासाठी काय करायला हवं, ते इथे माउली स्पष्ट करतात. हे सांगण्याची त्यांची पद्धतही किती प्रभावी आहे! म्हातारपणात एकेक अवयव कसा निकामी होत जातो, याचं चित्र ते उभं करतात, जसं की ‘पायांत पाय अडकतील, हात कापू लागतील. याप्रमाणे सर्व शरीराच्या चेष्टांचे (क्रियांचे) सोंग होईल. असं झाल्यावर जवळची माणसंदेखील याच्या मृत्यूची वाट पाहत राहतील.’ ज्ञानदेव वार्धक्याचं असं भेसूर चित्र रेखाटतात. त्यातून श्रोत्यांना जागृत करतात.

जनजागृतीचं हे कार्य करताना त्यांच्यातील वक्ता, कवी आणि गुरूही तितकाच प्रभावी आहे. एखादी गोष्ट करू नको असं सांगणं हा झाला उपदेश. उपदेश कुठे कोणाला आवडतो? म्हणून ज्ञानदेव तो अशा पद्धतीने करतात की ऐकणाऱ्यावर परिणाम व्हायलाच पाहिजे. हे झालं समुपदेशन ! ते तेव्हा उपयोगी होतं, आजही आहे, आणि उद्याही असणार!!

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत