Headlines

विवोचा धमाका! अवघ्या 13,999 रुपयात लाँच केला 5500mAh बॅटरी, AI फीचर्स असणारा बजेट फोन। Maharashtra Times


विवो कंपनीने बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Vivo T5e भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. अवघ्या 13,999 रुपये किंमत असलेल्या या फोनमध्ये ग्राहकांना प्रगत AI फीचर्स आणि 90Hz रिफ्रेश रेट असणारा उत्कृष्ट डिस्प्ले पाहायला मिळणार असून, या बजेट फोनची सध्या मोठी चर्चा आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Vivo T5e। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
कमी किमतीत तगडी बॅटरी शोधणाऱ्यांसाठी विवोचा हा नवा फोन उत्तम पर्याय आहे. यात 5500mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि लेटेस्ट अँड्रॉइड 16 चा सपोर्ट देण्यात आला आहे. कमी बजेटमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स, आधुनिक तंत्रज्ञान आणि न संपणारी बॅटरी लाईफ देण्यास हा स्मार्टफोन पूर्णपणे सक्षम आहे.

विवोने आपला नवीन स्मार्टफोन Vivo T5e भारतात लाँच केला आहे. हा फोन 5500mAh बॅटरीसह येतो, Android 16 वर आधारित OriginOS 6 आणि AI फीचर आहेत. कंपनीने यात IP64 रेटिंग, मिलिटरी ग्रेड ड्युरेबिलिटी आणि 90 हर्ट्ज डिस्प्ले देखील दिला आहे. फोनची सुरुवातीची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Vivo T5e: किंमत आणि उपलब्धता

Vivo T5e च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. हा स्मार्टफोन विवोच्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन मॅट फ्रेम डिझाइनमध्ये येतो आणि शॅडो ग्रे आणि एरो ब्लू या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Vivo T5e: डिस्प्ले, डिझाइन आणि प्रोसेसर

फोनमध्ये 6.74 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यात OriginOS 6 आधारित Android 16 आहे. परफॉर्मन्ससाठी Unisoc T7225 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4 GB रॅम आणि 4 GB रॅम आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 2 TB पर्यंत वाढवता येवू शकते. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

Vivo T5e: कॅमेरा

Vivo T5e मध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यामध्ये एआय कटआउट्स आणि विवो डॉकमास्टर सारख्या फीचर्स देण्यात आल्या आहेत. फोनमध्ये AI क्रिएशन फीचर देखील आहे, जे कंटेंटचा सारांश, भाषांतर आणि पुनर्लेखन करण्यास मदत करते.

Vivo T5e: बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

फोनमध्ये 5500mAh ची बॅटरी आहे, जी कंपनीच्या म्हणण्यानुसार 18 तासांपर्यंत ऑनलाइन व्हिडिओ प्लेबॅक, 47 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक, 13.5 तासांपर्यंत सोशल मीडिया वापर आणि 28 तासांपर्यंत व्हॉईस कॉलला सपोर्ट करते. हे 4 वर्षांसाठी 15W फास्ट चार्जिंग, रिव्हर्स चार्जिंग आणि बॅटरी हेल्थचा दावा करते.

याशिवाय IP64 डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टन्स, मिलिटरी ग्रेड ड्युरेबिलिटी, वेट हँड टच आणि ग्रीसी हँड टच सपोर्ट देखील उपलब्ध आहे, जेणेकरून स्क्रीन हलके पाणी किंवा तेल लावलेल्या हातांनी देखील वापरली जाऊ शकते.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा