Srikkanth on Rajat patidar : भारतीय संघाचे माजी निवडकर्ते आणि माजी खेळाडू एस. श्रीकांत यांनी टीम इंडियामधील खेळाडूवर टीका केली आहे. रजत पाटीदारच्या नावाची शिफारस करत त्याला संधी द्यावी अशी मागणी केली आहे. कोण आहे तो खेळाडू ज्याच्यावर निशाणा साधला जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचा पराभव करत जोरदार कमबॅक केले आहे. पण आयर्लंड आणि इंग्लंडमधील पराभव अद्याप कोणीही विसरू शकलेलं नाही. या दोन्ही मालिकांमध्ये भारताला एकही विजय मिळवता आला नव्हती. आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाने वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला पराभूत करत इतिहास रचला होता. त्यानंतर इंग्लंडमध्येही हेच पाहायला मिळालं. एक सामना रद्द झाला आणि चार सामन्यात भारताचा पराभव झाला होता. आता झिम्बाब्वेविरूद्ध भारताने ३-० ने मालिका जिंकली आणि आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवले. अशातच भारताचे माजी खेळाडू आणि निवडकर्ते एस. श्रीकांत यांनी तिलक वर्मावर टीक केली आहे. त्याच्या जागी आरसीबी संघाचा कर्णधार रजत पाटीदार याचे नाव त्यांनी घेतले आहे.
एस.श्रीकांत काय म्हणाले?
तिलक वर्मा याने पुन्हा एकदा ९ चेंडू खेळले, तो जास्त वेळ वेगवान गोलंदाजाला खेळू शकत नाही. त्याच्या खेळात सातत्य दिसत नाही, इंग्लंडमध्ये त्यांने काय केलं? कधी तरी तो एक चांगळी खेळी करतो. रजत पाटीदारच्या तुलनेत तो काहीच नाही. टी-२० क्रिकेटमध्ये दमदार खेळी करणारा फलंदाज हवा असेल तर रजतला संधी द्या. यश ठाकूरसारख्या अनेक खेळाडूंना संधी मिळत आहे तर मग रजतलाही भेटली पाहिजे, असं एस. श्रीकांत म्हणाले. Gautam Gambhir : गौतम गंभीरला हटवले तर टीम इंडियाची कमान कोणाकडे? हेड कोचसाठी 4 दिग्गज रेसमध्ये, एक सर्वात पुढे आता झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या मालिकेत तिलक वर्मा याने तीन सामन्यात १७९.०७ च्या स्ट्राइक रेटने ७७ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले होते. याआधीसुद्धा तिलवर स्लो खेळल्यामुळे टीका झाली आहे. तिलके दुसऱ्या सामन्यात नाबाद ६० धावांची अर्धशतकी खेळी केली होती. आयपीएलमध्ये सर्वांनी रजत पाटीदारला पाहिले असून त्याने आरसीबीला आपल्या नेतृत्त्वात दोन विजेतेपद जिंकवले आहेत. विशेष म्हणजे मिडल ऑर्डरला फलंदाजीला येत तो चांगलीच तडी देत होता. T Dilip : खराब फील्डिंगचा टी. दिलीप यांना फटका! टीम इंडियाला आता नवीन कोच मिळणार, महिला संघाच्या माजी दिग्गजाची होणार एन्ट्री? दरम्यान, रजत पाटीदार याने आयपीएलमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली ते पाहता भारतीय संघालाही मिडल ऑर्डरमध्ये अशाच आक्रमक खेळाडूची गरज आहे. त्यामुळे भारतीय संघात रजतला संधी दिली जावी अशी मागणी केली जाते.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा