Headlines

Balraj Sanghai Column | Planning For Life Purpose, Stability & Peace


42 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

दिवसभरच्या धावपळीनंतर शेवटी संध्याकाळी, रात्री लक्षात येतं की आज फक्त ओढाताणच आपल्या पदरी पडली. अंथरुणावर पडल्यावर ही झोप लागत नाही. अनेक लोकांना तर झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. काहीजण व्यसनाच्या आहारी जातात.

प्रत्येक जण दिवसभर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवत नाही की सगळी धावपळ, ओढाताण कशासाठी चालू आहे? दिवसभर आपण व्यवहाराकडे लक्ष देत असतो. एकावेळी अनेक कामं,अनेक व्यवहार असतात. काही गोष्टी काही व्यवहार आपल्या हातातले नसतात,आपल्या आटोक्यातले नसतात. ते पार पाडताना ताणतणाव होतो. हे सर्व अखेर कशासाठी चालू आहे? कोणत्या प्राप्तीसाठी चालू आहे? याचा विचार मात्र केलेला नसतो.

बहुतांशी नेमकी हीच चूक घडते की भौतिकतेच्या आहारी गेलेला मनुष्य साधनांना साध्य समजत आहे. प्रगती सोबत स्थिरता तणाव मुक्ती शांतता आंतरिक शांती हे साध्य आहे. यासाठी जी मेहनत करायची ती साधना. परंतु साधनापर्यंतच अडकत गेल्यामुळे साध्या पर्यंत पोहोचता येत नाही आणि परिणामी तो करणारा म्हणजे साधक हा अस्थिर, तणावग्रस्त, चिंताग्रस्त असाच असतो आणि दिसतो.

आज जगात वावरत असलेल्या किती लोकांना याची जाणीव आहे की जीवनाचा प्रमुख उद्देश शांती आणि स्थिरता आहे. ही शांती आणि स्थिरता मिळवण्यासाठी दिवसभराचे सगळे व्यवहार,धावपळ आणि उठाठेव करायची असते. सकाळी उठल्याबरोबर आपण साधारणपणे न बोलता दिवसभराची कामे मनात ठरवतो. ती कशाप्रकारे करायची याची आखणी करतो. आणि ते सर्व करत असताना काही पूर्ण होतात तर काही ना अडचणी येतात. असाच दिवस निघून जातो आणि शेवटी आपण थकलो आहोत, तणावग्रस्त आहोत,अत्यंत अस्थिर अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीने झोपतो.

आपल्या नियोजनामध्ये सगळी कामं असतात परंतु स्थिरता आणि शांतीचे नियमन नसते. कुठे थांबायचे, केव्हा थांबायचे हे निश्चित नसते. सगळी कार्य पार पाडत असताना मनाला शांतता केव्हा लाभली आणि वास्तविक जगण्याचा आनंद काही मिळाला का हे आपण तपासलेले नसते. जन्माला येणे आणि मागे नाव लौकिक न ठेवता केवळ कष्टात आयुष्य कंठून एके दिवशी मरणे याला जीवन जगणे असे म्हणत नाहीत. तसेच दिवस उजाडला, धावपळ, पळापळी कष्ट सुरू झाली आणि त्यामध्येच दिवसाचा शेवट झाला हा ही दिवसाचा निरर्थक वाईट अंत आहे.

म्हणून रोजच्या दिवशी दररोजच्या कामात जशी काम करायची पद्धत ठरवलेली असते त्यातच हे विसरायला नको हे सर्व धावपळ सर्व मेहनत ही स्थिरता आणि शांती लाभावी यासाठी आहे. म्हणून कुठेतरी थांबणे मनाला समजूत घालून घेणे आणि खरोखर खऱ्या अर्थाने जगणे महत्त्वाचे ठरते.

(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)

(संपर्क- 9420015108)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत