Headlines

‘भारताबाहेर जगणं सोपं काम नाही’, पॅरिसमधील तरुणानं दाखवलं वास्तव, व्हिडीओ पाहून व्हाल हैराण – indian in paris reveals the untold reality of living abroad video viral


Europe Jobs Reality: पॅरिसमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणाने सोशल मीडियावर दिसणाऱ्या आकर्षक जीवनशैलीच्या आहारी न जाता वास्तव समजून परदेशात जाण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Indian in Paris
(फोटो सौजन्य – lohan.enroute/Instagram)
युरोप-अमेरिकेत जाऊन करिअर करण्याचं स्वप्न जवळपास प्रत्येकानं कधी ना कधी पाहिलंच असेल. कारण तिथली जीवनशैली खूप चांगली आहे, असा आपला समज असतो. पण विदेशात गेल्यानंतर तिथलं वास्तव फारच वेगळं असतं, असा अनुभव पॅरिसमध्ये राहणाऱ्या एका भारतीय तरुणानं शेअर केला आहे. तो म्हणतो, ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून विदेशात जाऊ नका. कारण नोकरीचा आणि उदरनिर्वाहाचा संघर्ष तिथेही आहे. शिवाय, तुम्हाला यश मिळेल याची कोणतीही खात्री नसते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणत आहेत, “इतकंसुद्धा एक्सपोज करायचं नव्हतं.”

नेमकं काय म्हणाला हा तरुण?

​ ​

हा व्हिडीओ lohan.enroute या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. पॅरिसमध्ये राहणाऱ्या या भारतीय तरुणाचं नाव तनिष्क लोहान आहे. त्यानं विदेशात जाऊन करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

तो म्हणतो, “भारताबाहेर पडल्याशिवाय जग कसं आहे, हे कळणार नाही, हे खरं आहे. पण सोशल मीडियावर दिसणारी आकर्षक जीवनशैली पाहून युरोप किंवा अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेऊ नका. कारण स्वतःच्या देशाबाहेर राहणं सोपं नाही. सर्वप्रथम तुम्हाला तिथली भाषा शिकावी लागते. त्यानंतर तिथल्या जीवनशैलीशी जुळवून घ्यावं लागतं आणि पूर्णपणे आत्मनिर्भर बनावं लागतं. खाण्यापासून कपडे धुण्यापर्यंतची सर्व कामं स्वतःलाच करावी लागतात.”

तो पुढे म्हणतो, “परदेशात गेल्यानंतर लगेच नोकरी मिळेल, याची कोणतीही खात्री नसते. त्यामुळे संयम ठेवावा लागतो. कारण तिथेही नकाराचा सामना करावा लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपलं कुटुंब, मित्र-मैत्रिणी, संस्कृती आणि आपलं आयुष्य मागे सोडून पूर्णपणे नव्या वातावरणात आणि नव्या संस्कृतीत एकट्यानं संघर्ष करावा लागतो. या संघर्षात यश मिळेलच, याचीही खात्री नसते. त्यामुळे अपयश आलं, तर त्याची किंमत कुटुंबीयांनाही मोजावी लागते. कारण बहुतांश लोक कर्ज काढूनच विदेशात जातात.”

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

​ ​

हा व्हिडीओ १८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत वास्तव मांडल्याबद्दल तनिष्कचं कौतुक केलं आहे. यापूर्वीही अनेकांनी अशाच प्रकारचे व्हिडीओ शेअर करत परदेशात काम करताना आलेले चांगले आणि वाईट अनुभव मांडले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्या मनात कोणते विचार आले? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा