Headlines

‘रजत पाटीदारच्या तुलनेत तो काहीच नाही’; माजी खेळाडू एस. श्रीकांत टीममधील खेळाडूचं नाव घेत स्पष्टच बोलले


Srikkanth on Rajat patidar : भारतीय संघाचे माजी निवडकर्ते आणि माजी खेळाडू एस. श्रीकांत यांनी टीम इंडियामधील खेळाडूवर टीका केली आहे. रजत पाटीदारच्या नावाची शिफारस करत त्याला संधी द्यावी अशी मागणी केली आहे. कोण आहे तो खेळाडू ज्याच्यावर निशाणा साधला जाणून घ्या.

Srikkanth on Rajat Patidar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचा पराभव करत जोरदार कमबॅक केले आहे. पण आयर्लंड आणि इंग्लंडमधील पराभव अद्याप कोणीही विसरू शकलेलं नाही. या दोन्ही मालिकांमध्ये भारताला एकही विजय मिळवता आला नव्हती. आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाने वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला पराभूत करत इतिहास रचला होता. त्यानंतर इंग्लंडमध्येही हेच पाहायला मिळालं. एक सामना रद्द झाला आणि चार सामन्यात भारताचा पराभव झाला होता. आता झिम्बाब्वेविरूद्ध भारताने ३-० ने मालिका जिंकली आणि आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवले. अशातच भारताचे माजी खेळाडू आणि निवडकर्ते एस. श्रीकांत यांनी तिलक वर्मावर टीक केली आहे. त्याच्या जागी आरसीबी संघाचा कर्णधार रजत पाटीदार याचे नाव त्यांनी घेतले आहे.

एस.श्रीकांत काय म्हणाले?

तिलक वर्मा याने पुन्हा एकदा ९ चेंडू खेळले, तो जास्त वेळ वेगवान गोलंदाजाला खेळू शकत नाही. त्याच्या खेळात सातत्य दिसत नाही, इंग्लंडमध्ये त्यांने काय केलं? कधी तरी तो एक चांगळी खेळी करतो. रजत पाटीदारच्या तुलनेत तो काहीच नाही. टी-२० क्रिकेटमध्ये दमदार खेळी करणारा फलंदाज हवा असेल तर रजतला संधी द्या. यश ठाकूरसारख्या अनेक खेळाडूंना संधी मिळत आहे तर मग रजतलाही भेटली पाहिजे, असं एस. श्रीकांत म्हणाले.
Maharashtra TimesGautam Gambhir : गौतम गंभीरला हटवले तर टीम इंडियाची कमान कोणाकडे? हेड कोचसाठी 4 दिग्गज रेसमध्ये, एक सर्वात पुढे
आता झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या मालिकेत तिलक वर्मा याने तीन सामन्यात १७९.०७ च्या स्ट्राइक रेटने ७७ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले होते. याआधीसुद्धा तिलवर स्लो खेळल्यामुळे टीका झाली आहे. तिलके दुसऱ्या सामन्यात नाबाद ६० धावांची अर्धशतकी खेळी केली होती. आयपीएलमध्ये सर्वांनी रजत पाटीदारला पाहिले असून त्याने आरसीबीला आपल्या नेतृत्त्वात दोन विजेतेपद जिंकवले आहेत. विशेष म्हणजे मिडल ऑर्डरला फलंदाजीला येत तो चांगलीच तडी देत होता.
Maharashtra TimesT Dilip : खराब फील्डिंगचा टी. दिलीप यांना फटका! टीम इंडियाला आता नवीन कोच मिळणार, महिला संघाच्या माजी दिग्गजाची होणार एन्ट्री?
दरम्यान, रजत पाटीदार याने आयपीएलमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली ते पाहता भारतीय संघालाही मिडल ऑर्डरमध्ये अशाच आक्रमक खेळाडूची गरज आहे. त्यामुळे भारतीय संघात रजतला संधी दिली जावी अशी मागणी केली जाते.