Headlines

देशाला जिंकायची सवय लावणारे रोहित-कोहली लॉर्ड्सवर आणखी एक विक्रम रचणार, चाहत्यांसाठी कदाचित शेवटची पर्वणी


Rohit Sharma News : रोहित शर्मा वनडेतून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांदरम्यान लॉर्ड्सवरील तिसरा वनडे जो 19 जुलैला खेळवला जाणार आहे, तो त्याच्यासाठी खास ठरणार आहे. विराट कोहलीसोबत हा आंतरराष्ट्रीय सामना खेळत भारतीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे.

Rohit Sharma-Virat Kohli
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार का, किंवा त्याला संघाबाहेर करण्यात येणार का, याबाबत गेल्या काही तासांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर विविध दावे केले जात असले तरी याबाबत ना रोहित शर्माने कोणतेही वक्तव्य केले आहे, ना बीसीसीआयने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या वनडेत रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम आपल्या नावावर करतील.

रोहितच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माची बॅट अद्याप शांतच आहे. पहिल्या वनडेत त्याने 21 चेंडूत 11 धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात 47 चेंडूत 26 धावांची खेळी केली. त्याचा नेहमीचा आक्रमक अंदाज या दोन्ही डावांत दिसला नाही. भारताने पहिला सामना जिंकला असला, तरी दुसऱ्या वनडेत इंग्लंडने विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. याचदरम्यान रोहितचा तिसरा वनडे हा त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो, अशा बातम्यांनी जोर धरला. मात्र या चर्चांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळाली नाही.

Maharashtra TimesRohit Sharma : रोहित शर्माची इच्छा, आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर इमोशनल फेअरवेलची शक्यता वाढली

लॉर्ड्सवर रोहित-कोहलीचा ऐतिहासिक टप्पा

लॉर्ड्सवर रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरले, तर तो दोघांचा एकत्रित 400 वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही जोडीने इतके सामने एकत्र खेळलेले नाहीत. सध्या या दोघांच्या नावावर 399 सामने आहेत. कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दोघांनी निवृत्ती घेतल्यामुळे हा टप्पा वनडेत गाठला जाणार आहे.

सचिन-द्रविडचा विक्रम आधीच मोडला

रोहित शर्मा आणि विराट कोहली ही भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारी जोडी ठरली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा 391 सामन्यांचा विक्रम मागे टाकला. राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी 369 सामने एकत्र खेळले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये मात्र कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर 550 सामन्यांचा विक्रम आहे. तो मोडणे कठीण असले तरी लॉर्ड्सवर ‘रो-को’ भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान लिहिणार आहेत.

Maharashtra TimesJasprit Bumrah : भारताचे 6 फलंदाज मिळून करू शकले नाहीत ते एकट्या बुमराहने केलं; इंग्लंडविरुद्ध 154च्या स्ट्राईकने तुफान फटकेबाजी

दरम्यान, रोहितच्या निवृत्तीच्या चर्चा खऱ्या ठरल्या तर कदाचित रो-को ही जोडी पुन्हा चाहत्यांना एकत्र खेळताना दिसणार नाही. त्यामुळे चाहत्यांना दोघांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहण्याची ही शेवटची पर्वणी ठरु शकते.