Headlines

180 वर फक्त 3 विकेट, मग भारताचा डाव असा कसा कोसळला? इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकलाही पडला प्रश्न, काय म्हणाला?


IND vs ENG 2nd ODI : दुसऱ्या वनडेत भारताचा 233 धावांत डाव आटोपल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने भारतीय संघाच्या घसरणीवर आश्चर्य व्यक्त केले. जो रूटच्या खेळीचेही त्याने भरभरून कौतुक केले.

harry brook reacts after england win against india
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाला 233 धावांवर रोखत यजमान इग्लंडने 44.1 षटकांत लक्ष्य गाठत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. एकवेळ भारताची धावसंख्या 30 षटकांत 3 बाद 180 अशी होती आणि 300 धावांचा टप्पा सहज गाठेल असे वाटत होते. मात्र पुढील 60 धावांत तब्बल 7 विकेट गमावत भारताचा डाव कोसळला. सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक यानेही भारतीय संघाच्या या घसरणीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तो नेमकं काय म्हणाला हे जाणून घ्या.

’60 धावांत 7 विकेट पडणं खरंच विचित्र’

विजयानंतर बोलताना हॅरी ब्रूक म्हणाला, “मालिकेत पुनरागमन करण्यात आम्हाला यश आलं आणि आता निर्णायक सामन्याची उत्सुकता आहे. भारताला 233 धावांवर रोखणं ही आमच्या गोलंदाजांची मोठी कामगिरी होती. 30 षटकांनंतर भारत 180 धावांवर फक्त 3 विकेट गमावून मजबूत स्थितीत होता. मात्र सॅम करन आणि विल जॅक्स यांनी मधल्या षटकांत अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानंतर भारताने अवघ्या 60 धावांत 7 विकेट गमावल्या. हे पाहून मलाही आश्चर्य वाटलं.” ब्रूकने पुढे सांगितले की, खेळपट्टी आणि परिस्थिती लक्षात घेऊन संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्याचा निर्णय योग्य ठरला आणि त्याचा फायदा संघाला मिळाला.

Maharashtra TimesRohit Sharma-Virat Kohli : देशाला जिंकायची सवय लावणारे रोहित-कोहली लॉर्ड्सवर आणखी एक विक्रम रचणार, चाहत्यांसाठी कदाचित शेवटची पर्वणी

जो रूटचं भरभरून कौतुक

234 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. 8 धावांत दोन्ही सलामीवीर बाद झाले. मात्र अनुभवी जो रूट एका बाजूने खंबीरपणे उभा राहिला. त्याने नाबाद 99 धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला.

जो रूटबद्दल बोलताना हॅरी ब्रूक म्हणाला, “तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. ड्रेसिंग रूममध्येही त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. काही वर्षांपूर्वी त्याने फक्त तीन चौकारांच्या जोरावर शतक झळकावलं होतं, ती खेळी आजही माझ्या लक्षात आहे. आता आमचं संपूर्ण लक्ष लॉर्ड्सवरील निर्णायक तिसऱ्या वनडेकडे आहे. तेथील परिस्थितीचा अभ्यास करून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करू.”

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा